मोदी यांच्या नावावर किती संपत्ती जाणून घ्या? घर, दुकान आणि किती शेती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असून, त्यांच्या वैयक्तिक संपत्तीची माहिती पुन्हा चर्चेत आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जाहीर केलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2026 रोजी नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण 4 कोटी 1 लाख 60 हजार 999 रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घोषणेमध्ये त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील देण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मोदी यांच्या नावावर कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. म्हणजेच त्यांच्या नावावर शेतजमीन, बिगरशेती जमीन, व्यावसायिक मालमत्ता किंवा निवासी घर अथवा सदनिका नसल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे.मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये बँक ठेवी आणि मुदत ठेवींचा मोठा वाटा आहे. SBI च्या गांधीनगर एनएससी शाखेतील त्यांच्या खात्यात 3,562 रुपये जमा आहेत. (Narendra Modi) याशिवाय बँक एफडी आणि एमओडीमध्ये 3 कोटी 79 लाख 76 हजार 101 रुपयांची रक्कम असल्याचे नमूद आहे. त्यांच्या नावावर 34,429 रुपयांची रोख रक्कमही दाखवण्यात आली आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच NSC मध्ये मोदी यांच्या नावावर 10 लाख 24 हजार 724 रुपये जमा आहेत. याशिवाय त्यांच्या मालमत्ता घोषणेमध्ये सोन्याचाही समावेश आहे. (Narendra Modi) त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या असून त्यांचे एकूण वजन सुमारे 45 ग्रॅम आहे. या सोन्याची अंदाजे किंमत 4 लाख 58 हजार 864 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. आज त्यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासासोबतच वैयक्तिक आयुष्य आणि संपत्तीची माहितीही चर्चेत आहे. PMO कडील 31 मार्च 2026 पर्यंतच्या घोषणेनुसार, त्यांच्या नावावर कोणतेही घर, दुकान किंवा शेती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?

 नांदणीत ‘माधुरी’ला पाहण्यासाठी गर्दी कायम?