ग्राहकांना झटका सोनं-चांदी आणखी महागणार, सरकारने घेतला मोठा निर्णय?

सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ होणार सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात ६७ टक्के वाढ सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग शुल्क ७५ रुपये करण्यात आले चांदीच्या दागिन्यांसाठी नवीन हॉलमार्किंग शुल्क लागणार

सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. सोनं-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ होणार आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने सोनं आणि चांदीच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग शुल्क ४५ रुपयांवरून ७५ रुपयांपर्यंत वाढवले आहे. सरकारने हॉलमार्किंगचा खर्च तीन पटीने वाढवला आहे (Gold and silver) त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. म्हणजे एकाच फटक्यात सुमारे ६७ टक्के वाढ झाली आहे.

नवीन प्रणालीनुसार, आता सोन्याच्या प्रत्येक दागिन्याच्या हॉलमार्किंगसाठी ७५ रुपये द्यावे लागणार आहेत. सोन्याचे भाव आधीच जास्त आहेत आणि आता हॉलमार्किंग शुल्कातील हा बदल अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा सराफ व्यावसायिक नवरात्री, दसरा आणि दिवाळीची तयारी करत आहेत. सणासुदीचा आणि लग्नसराईचा काळ असल्यामुळे अनेक जण सोनं खरेदी करत आहेत. (Gold and silver) अशामध्ये आता त्यांना सोनं आणि चांदीचे दागिने खरेदी करताना जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे.

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने हॉलमार्किंग नियम २०२६ मध्ये सुधारणा केली आहे. यासंबंधीची अधिसूचना १४ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आली. नवीन हॉलमार्किंग शुल्क राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून लागू झाले आहे. नवीन नियमांनुसार, सराफांना मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्रांवर प्रत्येक सोन्याच्या वस्तूसाठी ७५ रुपये हॉलमार्किंग शुल्क भरावे लागेल. प्रत्येक कंसाइनमेंटसाठी किमान शुल्क २०० रुपये असणार आहे. प्रत्येक चांदीच्या वस्तूसाठी हॉलमार्किंग शुल्क ३५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. चांदीच्या वस्तूंच्या प्रत्येक कंसाइनमेंटसाठी किमान १५० रुपये शुल्क भरावे लागेल.

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हॉलमार्किंग केंद्राकडून BIS साठी शुल्क आकारले जाईल. सोन्याच्या वस्तूंसाठी हे शुल्क प्रति वस्तू ७.५० रुपये असेल, आणि प्रति खेपकंसाइनमेंट किमान २० रुपये असेल. चांदीसाठी हे शुल्क प्रति वस्तू ३.५० रुपये असेल आणि प्रति कंसाइनमेंट किमान १५ रुपये असेल. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने लागू केले कर अतिरिक्त असतील.

दरम्यान, सोनं-चांदीच्या दागिन्यांवर ३ टक्के जीएसटी लागतो. यामध्ये राज्यांतर्गत विक्रीसाठी १.५ टक्के सीजीएसटी आणि १.५ टक्के एसजीएसटीचा समावेश आहे. तर आंतरराज्यीय खरेदीवर ३ टक्के आयजीएसटी आकारला जातो. सोन्याची शुद्धता बदलली तरीही हे जीएसटीचे दर कायम असतात. गणेशोत्सव सध्या सुरू आहे. नवरात्री, दसरा, दिवाळी आणि मग लग्नसराईचा हंगाम जवळ आला आहे. (Gold and silver) अशात हॉलमार्किंग शुल्कातील बदलामुळे सराफांच्या खर्चात आणखी एका घटकाची भर पडू शकते. देशात १० ग्रॅम सोन्याची किंमत आधीच १,५१,८९४ रुपये असताना हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता १ तोळा सोनं खरेदीसाठी आणखी पैसे माजावे लागणार आहेत.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?

 नांदणीत ‘माधुरी’ला पाहण्यासाठी गर्दी कायम?