MPSC पेपर फुटी प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. संचालकासह आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या पेपरसाठी 5 लाखांचा व्यवहार करून पेपर फोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीमधून एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप आहे. (MPSC paper) आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नंदुरबारमधील पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई केल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकरणी कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, औषध निरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेली ऋतुजा पाटील, गौरव पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील आणि गौरवच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. एमपीएससीचा सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे देखील नंदूरबार तालुक्यातील धामळोड गावातील आहेत. गोपाळ मराठे यांनी नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीतून एमपीएससी पूर्व परीक्षेची तयारी केल्याची माहिती आहे.
पेपरफुटी प्रकरणात नंदुरबारमधून आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रेमप्रकरणातून पेपरफुटी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.(MPSC paper) या प्रकरणात लकी पाटील उर्फ गौरव पाटील यांचा मोबाईल तपासला जाणार आहे. गौरव पाटील यांच्या मोबाईलसाठी मुंबई पोलीस त्यांच्या वडिलांना घेऊन नंदुरबार येण्याची शक्यता असून गौरव पाटील यांच्या मोबाईल देखील ताब्यात घेतला जाणार आहे. गौरव पाटील यांच्या वडिलांची विचारपूस मुंबई पोलीस दलाकडून केली जात आहे. त्यामुळे यात आणखी काही पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
MPSC पेपर लीक प्रकरणात संशयित आरोपी ऋतुजा पाटील यांचे वडील अमृत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. (MPSC paper) ते नंदुरबारच्या शहादामधील जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेकडून अमृत पाटील यांना २०२३-२४ या वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या MPSC औषध निरीक्षक पदाच्या पेपर लीक प्रकरणात अमृत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?