नवं संकट समुद्रात तयार झालं भयानक वादळ महाराष्ट्रासह 13 राज्यांना पावसाचा अलर्ट?

देशातील अनेक भागांमध्ये सध्या मान्सून सक्रिय असून विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २९ ऑगस्ट रोजी ओडिशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. (monsoon) त्यामुळे शनिवारी देशातील अनेक भागांमध्ये हवामान बदललेलं पाहायला मिळू शकतं.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेश आणि लगतच्या भागात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पुढील २४ तासांत काहीसं कमजोर होण्याची शक्यता आहे. मात्र, या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्याचवेळी बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात चक्रीवादळसदृश वाऱ्यांचं क्षेत्र सक्रिय आहे. (monsoon) त्यामुळे २९ ऑगस्टच्या आसपास उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तसेच पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या परिसरात आणखी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व भारतातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

ओडिशामध्ये शनिवारी हवामान सर्वाधिक सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, यासोबत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. पश्चिम बंगालमध्येही काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज असून, २८ आणि २९ ऑगस्टनंतर ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यानही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.उत्तर प्रदेशात पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. २९ ऑगस्ट रोजी पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागांत पाऊस पडू शकतो. त्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा आणखी एक टप्पा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्येही २९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज असून, काही भागांत मेघगर्जनेसह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. झारखंडमध्येही शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राजधानी दिल्लीबाबत सध्या तुलनेने दिलासादायक अंदाज आहे. २९ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून सध्या कोणताही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, मान्सून ट्रफ दिल्लीच्या आसपासच्या भागातून जात असल्याने काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.मध्य भारतातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेशात २८ ते ३० ऑगस्टदरम्यान व्यापक पाऊस पडण्याचा अंदाज असून २९ ऑगस्ट रोजी काही भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. पश्चिम मध्य प्रदेशातही काही दिवस पावसाची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान पावसाचा सिलसिला सुरू राहण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः विदर्भात २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान व्यापक पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच गुजरात आणि सौराष्ट्र-कच्छमधील काही भागांतही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम-मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्येही पावसाची शक्यता कायम आहे. (monsoon) त्यामुळे पुढील काही दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा जोर पाहायला मिळणार असून, नागरिकांनी स्थानिक हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत राजकीय भूकंप प्रकाश आवाडेंची लोकसभा लढण्याची तयारी खासदार माने गटाची धाकधूक वाढली?

महाराष्ट्रात पाऊस कोसळणार की नाही? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज?

८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका डॉक्टरांनी सांगितले?