रक्षाबंधन – नारळी पौर्णिमेचा दुहेरी योग नृसिंहवाडी भाविकांच्या गर्दीने फुलली?

रक्षाबंधनाची सुट्टी आणि नारळी पौर्णिमेचा सण एकाच दिवशी आल्याने नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दत्त दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने नृसिंहवाडीत दाखल झाले होते. (Nrusinghwadi) त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर दिवसभर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता.

शुक्रवारी पहाटे काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. (Nrusinghwadi) पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळच्या सत्रानंतरही भाविकांची गर्दी कमी झाली नाही. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा दुहेरी योग असल्याने कुटुंबासह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती.

दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. भाविकांनी श्री दत्तांचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली. मंदिरातील विविध धार्मिक विधींमध्ये भाविकांनी सहभाग घेतला. सणानिमित्त नृसिंहवाडीमध्ये मोठी वर्दळ निर्माण झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

पहाटेच्या काकड आरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला होता. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये (Nrusinghwadi) यासाठी मंदिर परिसरात आवश्यक नियोजन करण्यात आले होते. रक्षाबंधनाच्या सुट्टीमुळे आणि नारळी पौर्णिमेच्या पर्वामुळे यंदा श्री दत्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक नृसिंहवाडीत दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा :

अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन् राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट?

सप्टेंबर महिना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार, साखर, दूधनंतर आता प्रवासही महागणार?

एकामागून एक महाआपत्ती नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?