राहुल गांधी अडचणीत सापडलल्याची चर्चा आहे. हल्दानी प्रकरणावरून केलेल्या विधानावरून राहुल गांंधींच्या विरोधातच FIR दाखल झाल्याचे समोर आलं आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी अडचणीत सापडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राहुल गांधींच्या विरोधातच उत्तराखंडच्या हल्दानी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाली आहे. अमित कुमार नावाच्या तरुणाच्या तक्रारीवरून राहुल गांधींच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. (Rahul Gandhi) अनुसूचित वर्गाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अमित कुमारने राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल केली. राहुल गांधींच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
राहुल गांधींच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 196 आणि 299 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच तक्रारीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा, 1989 च्या कलम (1) अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसच्या सभेनंतर हल्दानीत शुद्धीकरण यज्ञ केल्याची टिप्पणी राहुल गांधी यांनी केली होती. गांधींनी हा विधी दलितविरोधी असल्याचा आरोप केला होता. परंतु राहुल गांधींच्या वक्तव्यावरून अनुसूचित जातींच्या भावना दुखावल्याचा दावा अमित कुमार याने केला आहे.
हल्दानीत 8 ऑगस्ट रोजी काँग्रेसची रॅली झाली. यानंतर एका हिंदू संघटनेने रामलीला मैदानावर शुद्धीकरणासाठी यज्ञ केल्याचा आरोप आहे. (Rahul Gandhi) परंतु रामलीला मैदानातील अस्वच्छता आणि कथित घोषणांच्या विरोधात शुद्धीकरण यज्ञ केल्याचा हिंदू संघटनेचा दावा आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या शुद्धीकरण यज्ञाला दलितविरोधी असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी या विधीचा उघडपणे विरोध केला होता. खरगे यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
राहुल गांधींवर FIR दाखल होताच पोलिसांकडून तपास सुरू मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधानंतर राहुल गांधी यांनी शुद्धीकरण यज्ञाला दलितविरोधी म्हणत भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला होता. राहुल गांधी यांच्या विधानाचा संदर्भ घेत अमित कुमारने हल्दानी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारदार अमित कुमार याने राहुल गांधींवर अनुसूचित जातींच्या समाजाच्या भावना दुखावल्याचा खळबळजनक आरोप केलाय. (Rahul Gandhi) यावरुन पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :
CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?
राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?
एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?