ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, (Sharad Pawar) ज्यामुळे गूढ वाढले आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांचा नियोजित दुष्काळी दौरा रद्द करण्यात आला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांच्या (Sharad Pawar) सल्ल्यानुसार त्यांना रुबी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. मात्र, पवारांना नेमकं काय झालं? अचानक तब्येक कशी बिघडली? याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. पवार कुटुंबीय आणि डॉक्टरांकडून अद्याप पवारांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आलेली नाही.
शरद पवार यांनी शनिवार 31 ऑक्टोबर आणि रविवार 1 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती. यावेळी तुळशी गावात त्यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला होता. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही ऐकून घेतल्या होत्या. या समस्या सरकार दरबारी मांडण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.
मात्र, आज होणारा शरद पवार यांचा दुष्काळी दौरा रद्द करण्यात आला होता. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीचं कारण देऊन हा दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र, पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळेच हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. (Sharad Pawar) त्यानंतर पवार हे सोलापूरहून पुण्याला आले होते. पण त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुबी रुग्णालयात त्यांच्या विविध चाचण्या केल्या जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, पवारांना नेमकं काय झालं हे अद्याप समोर आलं नाही.
दिवाळीनंतर शरद पवार हे करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहणी करणार आहे. काल रात्री बारामती, भिगवण परिसरात मोठा पाऊस झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. करमाळयात दिवाळीनंतर शरद पवार नक्की पाहणी करतील, असं सांगतानाच पवारांना भेटूनच मी करमाळ्याला गेलो होतो. मी दौऱ्याची तयारी करत होतो, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा :
नोव्हेंबरमध्ये बँका एकूण 17 दिवस बंद असणार, महाराष्ट्रात किती दिवस
लेक लाडकी योजनेच्या नियमात मोठा बदल, आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता थेट
ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेणार : पालकमंत्री