देशातील नोकरदार वर्गासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO आपल्या सिस्टिममध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. ‘EPFO 3.0’ या नव्या प्रणालीच्या माध्यमातून PF खात्याशी संबंधित अनेक प्रक्रिया अधिक सोप्या आणि डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. या नव्या व्यवस्थेमुळे PF खाते बँक खात्याप्रमाणे वापरण्याची सुविधा मिळण्याची शक्यता असून, भविष्यात UPI आणि ATMच्या माध्यमातूनही PFमधून पैसे काढता येऊ शकतात.

सध्या PFमधून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना ऑनलाइन क्लेम करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. (amount) अनेकदा कागदपत्रांची पूर्तता, पडताळणी आणि इतर प्रक्रियांमुळे पैसे खात्यात जमा होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. काही प्रकरणांमध्ये क्लेममध्ये त्रुटी आढळल्यास तो नाकारला जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे PFची रक्कम गरजेच्या वेळी मिळण्यास विलंब होतो. हीच प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी EPFOकडून तंत्रज्ञानाच्या पातळीवर मोठे बदल केले जात आहेत.
‘EPFO 3.0’ ही अधिक आधुनिक आणि केंद्रीय IT प्रणाली असणार आहे. सध्याच्या व्यवस्थेत EPFOचा डेटा विविध प्रादेशिक कार्यालयांच्या सर्व्हरशी संबंधित असल्याने पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. (amount) अनेकदा वेबसाइट स्लो होणे किंवा पोर्टल बंद पडण्याचा अनुभव कर्मचाऱ्यांना येतो. नव्या प्रणालीमध्ये क्लाऊड-बेस्ड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने या समस्या कमी होऊन सेवा अधिक वेगवान आणि स्थिर होण्याची अपेक्षा आहे.
नव्या व्यवस्थेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे PF अॅडव्हान्स क्लेमची प्रक्रिया. आजारपण, लग्न, घर खरेदी किंवा बांधकाम यांसारख्या कारणांसाठी PFमधून आगाऊ रक्कम काढण्याची सुविधा आहे. नव्या प्रणालीमध्ये पात्र दाव्यांची संगणकीय पद्धतीने पडताळणी करून प्रक्रिया अधिक स्वयंचलित करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची गरज कमी होऊ शकते आणि पात्र कर्मचाऱ्यांना रक्कम तुलनेने लवकर मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे भविष्यात PF खात्याला UPI नेटवर्कशी जोडण्याची योजना असल्याची चर्चा आहे. (amount) यामुळे छोट्या किंवा तातडीच्या आर्थिक गरजांसाठी PFमधून रक्कम काढण्याची प्रक्रिया आणखी सोपी होऊ शकते. UPI किंवा ATMच्या माध्यमातून ठरावीक मर्यादेपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेळी स्वतंत्र क्लेम दाखल करण्याची गरज भासणार नाही. विशेषतः वैद्यकीय उपचार किंवा इतर आपत्कालीन खर्चाच्या वेळी ही सुविधा कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते.
EPFO 3.0च्या लॉन्चबाबत यापूर्वीही विविध तारखा समोर आल्या होत्या. जुलैमध्ये ही प्रणाली आणण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस काही तांत्रिक सुधारणा करून ती सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे लॉन्चला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. आता सप्टेंबर २०२६ मध्ये या नव्या सुविधांची सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मात्र, येथे महत्त्वाची बाब म्हणजे EPFOकडून अद्याप EPFO 3.0च्या पूर्ण लॉन्चची अधिकृत तारीख किंवा UPI आणि ATMमधून PF रक्कम काढण्याच्या सुविधेबाबत अंतिम घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या समोर येत असलेल्या तारखा आणि सुविधांना संभाव्य बदल म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.
EPFO 3.0 प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर PFशी संबंधित सेवा अधिक डिजिटल, जलद आणि सोप्या होण्याची अपेक्षा आहे. नोकरदारांच्या दीर्घकाळापासून असलेल्या PF क्लेमच्या प्रक्रियेशी संबंधित अडचणी कमी झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे EPFO 3.0 कधी लॉन्च होणार आणि UPI-ATMची सुविधा नेमकी कधी उपलब्ध होणार, याकडे नोकरदार वर्गाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?
राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?
एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?