4 सप्टेंबरला UPI बंद, या बड्या बँकेकडून तातडीचा संदेश

भारतात युपीआय पेमेंट करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.(message) तुम्ही SBI च्या UPI द्वारे दररोज पेमेंट करत असाल, तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, देखभाल-दुरुस्तीच्या मेंटेनन्स कामामुळे 4 सप्टेंबरच्या रात्री काही काळ UPI द्वारे पेमेंट करता येणार नाही. मात्र, या कालावधीत UPI Lite चा वापर करता येणार असल्याने छोट्या पेमेंटसाठी ग्राहकांकडे पर्याय उपलब्ध असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.SBI च्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12:15 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत UPI सेवा उपलब्ध राहणार नाही. म्हणजेच सुमारे 45 मिनिटे UPI सेवेवर परिणाम होणार आहे. बँकेने हेही स्पष्ट केले आहे की, देखभालीचे काम निश्चित वेळेपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात ग्राहक छोट्या पेमेंटसाठी UPI Lite चा वापर करू शकतात. UPI Lite द्वारे 1,000 रुपयांपर्यंतचे छोटे व्यवहार करता येतात आणि प्रत्येक वेळी UPI PIN टाकण्याची आवश्यकता नसते.

UPI द्वारे एका दिवसात एकूण 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येतात. (message)पर्सन-टू-पर्सन म्हणजेच P2P पेमेंटमध्ये दररोज 20 व्यवहार करता येतात. त्याचवेळी काही व्हेरिफाइड मर्चंट कॅटेगरीसाठी अधिक व्यवहार मर्यादा उपलब्ध आहे. इन्शुरन्स आणि कॅपिटल मार्केटसाठी ही मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत, तर IPO, टॅक्स पेमेंट, हॉस्पिटल तसेच शाळा-कॉलेजसाठी 5 लाख रुपयांपर्यंत आहे.सरकार UPI वरील काही निवडक मर्चंट व्यवहारांवर MDR म्हणजेच Merchant Discount Rate लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबत सप्टेंबरच्या मध्यापर्यंत अधिसूचना जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, MDR चा दर, व्यवहाराची मर्यादा आणि इतर नियम अद्याप अधिकृतपणे निश्चित करण्यात आलेले नाहीत.

सरकारने स्पष्ट केले आहे की, सामान्य नागरिकांकडून UPI पेमेंट करण्यासाठी (message)कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. P2P व्यवहारही मोफतच राहतील. MDR लागू झाल्यास तो केवळ काही निश्चित मर्चंट व्यवहारांवर लागू होईल. सध्या UPI व्यवहारांवर MDR आकारला जात नाही.गेल्या काही वर्षांत UPI मुळे डिजिटल पेमेंट करणे मोठ्या प्रमाणात सोपे झाले आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये UPI वर सुमारे 2 कोटी व्यवहार झाले होते. ही संख्या आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वाढून 24,162 कोटींहून अधिक झाली. याच कालावधीत UPI व्यवहारांची एकूण रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2016-17 मध्ये व्यवहारांची एकूण किंमत 0.07 लाख कोटी रुपये होती, ती 2025-26 मध्ये वाढून सुमारे 314 लाख कोटी रुपये झाली.

हेही वाचा :

मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, न्यायालयातून मोठी बातमी, कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय?

अजब पुण्यातील गजब प्रकार दोन मुलांनी आई-वडिलांना मार मार मारलं भर रस्त्यात व्हिडीओ पाहून धक्काच बसेल?

“आम्हाला दान नको, नुकसानभरपाई द्या”महापुरानंतर नेपाळची भारत, अमेरिका अन् चीनकडे मागणी?