सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?

खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातील ‘स्लो पॉयजनिंग’ची धक्कादायक शक्यता वर्तवली आहे. राहुल गांधींनी त्यांना ‘टॉक्सिक टेस्ट’ करण्याचा सल्ला दिला आहे. समाजात लढणाऱ्यांवर असे प्रसंग येतात आणि सरकार क्रूर असते, असे राऊत म्हणाले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यांना ही शंका आहे.

जे लोक समाजासाठी लढतात. आंदोलन करतात. लोकांसाठी आवाज उठवतात. तुरुंगात असताना त्यांच्या जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता असते. मीच नाही. (Sanjay Raut) अनेक लोक तुरुंगात असतात. त्यांच्या खाण्यापिण्यात हे लोक गडबड करू शकतात हा सर्वांना डाऊट आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ही शंका व्यक्त करून मला अलर्ट केलं आहे. त्यांनी मला एक टॉक्सिक टेस्ट करायला सांगितली आहे. मी ती टेस्ट करणार आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.

खासदार संजय राऊत काल कोल्हापुरात होते. (Sanjay Raut) यावेळी त्यांनी तुरुंगातून आल्यानंतर मला कॅन्सर झाल्याचं म्हटलं होतं. त्यावर, तुमच्यावर तुरुंगात विषप्रयोग झाला का? असा सवाल राऊत यांना करण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर दिलं. राहुल गांधींनीही याबाबत संशय व्यक्त केला आहे. 10 दिवसापूर्वी मी राहुल गांधींना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी शंका व्यक्त करून मला टॉक्सिक टेस्ट करायला सांगितली. ही टेस्ट करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. तुमच्या सारख्या माणसाला आजार व्हावा हे अनाकलनीय आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ टेस्ट करून घ्या, असं राहुल गांधी म्हणाले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

सरकार क्रूर असतं. तुरुंगात असताना ते काहीही करू शकतं. काही प्रमुख नेत्यांशी मी चर्चा केली. तुरुंगात असताना प्रकृती खालावलेल्या नेत्यांशीही चर्चा केली. (Sanjay Raut) त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली. या आधी मी त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. तुरुंगात असताना जेवणात विष मिसळलं जाण्याची शक्यता असते. मी तुरुंगातून आल्यावरच हा आजार सुरू झाला, असं राऊत म्हणाले.

हेही वाचा :

मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, न्यायालयातून मोठी बातमी, कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय?

अजब पुण्यातील गजब प्रकार दोन मुलांनी आई-वडिलांना मार मार मारलं भर रस्त्यात व्हिडीओ पाहून धक्काच बसेल?

“आम्हाला दान नको, नुकसानभरपाई द्या”महापुरानंतर नेपाळची भारत, अमेरिका अन् चीनकडे मागणी?