सध्या देशाच्या राजकारणात आमदार, खासदार फोडफोडीचं सत्र सुरु आहे.(Chief Minister) पण या फोडाफोडीचा एक पॅटर्न आहे. एखाद-दुसरा आमदार, खासदार फुटला तर पक्षांतरबंदी कायदा लागू होतो. म्हणून एक मोठा गटच फुटला तर सत्ताधाऱ्यांसाठी ते सोयीचं ठरतय. आता तामिळनाडूच्या राजकारणात सुद्धा अशीच फोडफोडी होणार आहे. पण त्याचा पॅटर्न वेगळा असेल. मुख्यमंत्री विजय यांच्या नित्तीमतेवर विरोधकांना प्रश्न उपस्थित नाही करता येणार. तामिळनाडूत मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या नेतृत्वाखाली TVK पक्ष लवकरच स्वबळावर बहुमताचा आकडा गाठू शकतो. राज्यात सात विधानसभा जागा खाली झाल्यामुळे आधीच विजय यांचा पक्ष बहुमताच्या जवळ आहे. ‘तमिलगा वेट्री कझगम’ टीवीके अंतर्गत सूत्रांनुसार ‘ऑपरेशन L’ अंतिम टप्प्यात आहे. एआयएडीएमकेचे 10 आमदार लवकरच पक्ष बदलू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार 15 ऑगस्टपर्यंत टीवीकेचं ऑपरेशन पूर्ण होऊ शकतं. एआयएडीएमकेच्या आमदारांची संख्या कमी होऊन 41 झाली आहे. पक्षाच्या अनेक आमदारांना भविष्यातील त्यांच्या राजकारणाची चिंता सतावत आहे.

टीवीके नेते आणि एआयएडीएमकेच्या आमदारांमध्ये चर्चा सुरु आहे.(Chief Minister) या चर्चेशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षाचे जवळपास 10 आमदार 15 ऑगस्टआधी आपल्या विधानसभा जागांचा राजीनामा देऊन औपचारिकरित्या सत्ताधारी TVK मध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे विधानसभा पोटनिवडणूक लागेल. स्वातंत्र्यदिनाआधी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते असं इंडियन एक्सप्रेसने एका वरिष्ठ नेत्याच्या हवाल्याने म्हटलं आहे.
बहुमताचा आकडा कसा जमवणार
234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत(Chief Minister) सात जागा रिक्त आहेत. त्यामुळे संख्या कमी होऊन 227 झाली आहे. टीवीके आमदारांची संख्या 107 आहे. एआयएडीएमकेचे माजी मंत्री सी विजयभास्कर आणि एम आर विजयभास्कर यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर टीवीकेमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री एम एस एम आनंदन, एस वलारमथी, पक्षाचे अनेक माजी आमदार आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. 10 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर 234 सदस्यांच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या 217 होईल. अशावेळी बहुमताचा आकडा 108 होईल. दिनाकरण पार्टीच्या एकमेव आमदाराच्या पाठिंब्यानंतर टीवीकेचा स्वत:चा आकडा 108 होईल.
विषय फक्त आमदारकीच्या राजीनाम्याचा नाही
टीवीके आणि एआयएडीएमकेच्या सूत्रांनुसार सीवी शनमुगम आणि एस पी वेलुमणी जुलै अखेर किंवा (Chief Minister)ऑगस्टच्या सुरुवातीला टीवीकेमध्ये प्रवेश करतील. विषय फक्त पक्ष बदलण्यापुरता मर्यादीत नाही. ज्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायचा आहे, त्यांना टीवीकेकडून पुन्हा पोटनिवडणुकीत संधी मिळेल हा विश्वास दिला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ नेत्यांना पुन्हा निवडून आल्यावर कॅबिनेटमध्ये स्थान देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
हेही वाचा :
मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?
चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?