मैत्रिणी ओरडत होत्या, मागून धावत होत्या, सावध करीत होत्या. त्यांची हाक हेडफोन लावून चालत असताना ऐकू आली नाही. (wearing) तोवर भरधाव वेगाने धावणाऱ्या रेल्वेने तिला उडवले. अन् तिच्या आयुष्याची जीवनरेखा संपुष्टात आली. ही घटना घडली १७ वर्षीय युवती अनुष्का संतोष पोवार हिच्या बाबतीत.

हातकणंगले येथील रेल्वे रुळावरून जात असलेल्या १७ वर्षीय युवतीचा धावत्या रेल्वेची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. अनुष्का संतोष पोवार (वय १७, रा. वेताळपेठ, गल्ली क्रमांक ३, इचलकरंजी) असे मृत युवतीचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले ग्रामीण रुग्णालय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर ही धक्कादायक घटना घडली. अनुष्का ही कोरोची येथील शिक्षण संस्थेत डीएमएलटी प्रथम वर्ष वैद्यकीय आरोग्य परिचरचे शिक्षण घेत होती. अनुष्का आपल्या दोन वर्गमैत्रिणींसोबत ग्रामीण रुग्णालय परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असताना तिघी रेल्वे रुळाच्या बाजूने चालत होत्या. (wearing) यावेळी अनुष्का मैत्रिणींपेक्षा २५ फूट पुढे होती. तिच्या दोन्ही कानात ब्लूटूथ वायरलेस इयरबड्स सुरू होते. ती मोबाईलवर गाणी ऐकत किंवा फोनवर बोलत असल्याने तिला मागून येणाऱ्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस धनबाद एक्स्प्रेस गाडी क्रमांक ११०४५ चा हॉर्न ऐकू आला नाही.
मैत्रिणींना भरधाव एक्स्प्रेस येत असल्याचे दिसताच त्यांनी अनुष्का थांब असा टाहो फोडत तिच्या दिशेने धाव घेतली. मात्र इयरबड्समुळे (wearing) त्यांचा आक्रोश तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही आणि मैत्रिणी अवघ्या दहा फूट अंतरावर असतानाच एक्स्प्रेसने अनुष्काला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेने तिचा मृतदेह सुमारे ३० फूट हवेत उडाला. डोक्याचा चेंदामेंदा झाला. रक्ताचे शिंतोडे मैत्रिणींच्या अंगावर उडाल्याने तीव्र आघाताने दोन्ही मैत्रिणी जागीच बेशुद्ध पडल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयातील जीवरक्षक स्वप्निल नरूटे यांनी धाव घेऊन बेशुद्ध मैत्रिणींना उपचारासाठी दाखल केले. तर अनुष्काला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हातकणंगले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू असून अनुष्काच्या मागे आई, वडील, आजी, आजोबा आणि छोटा भाऊ असा परिवार आहे. मोबाईलवर बोलताना किंवा हेडफोन वापरताना नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी रेल्वे रूळ ओलांडताना किंवा चालताना सतर्क राहणे किती गरजेचे आहे, ही बाब या दुर्घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
हेही वाचा :
सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट?
सरकारला सदबुद्धी देवो शरद पवारांचा शनिवारी मोर्चा दुष्काळ दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरणार?
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी सलग 3 दिवस बँका बंद, कामं आधीच उरकून घ्या?