अचानक कार्यप्रवण झालेला अन्न व औषध प्रशासन विभाग?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

प्रशासनात असे काही विभाग आहेत, की तेथील काही अधिकाऱ्यांची नाळ भ्रष्टाचाराशी जोडलेली असते. आणि त्यामुळे हे विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढवणारे असतात. काही विभागांचे नेमके काय काम असते हे तर अनेकांना माहीत सुद्धा नसते. अन्न व औषध प्रशासन विभाग हा त्यापैकीच एक. गेल्या काही दिवसांपासून हा विभाग अचानक कार्यप्रवण झालेला आहे आणि त्याला कारण ठरले आहेत तुकाराम मुंढे!

तुकाराम मुंढे हे असे आयएएस अधिकारी आहेत की त्यांची सलग वर्षभर सेवा कोणत्याही विभागात झालेली नाही. सतत त्यांचे विभाग बदलत असतात, कारण ते ज्या विभागात धुमधडाक्याने काम करत असतात त्या विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा एक गट ताबडतोब सक्रिय होतो आणि त्यांच्याकडून तुकाराम मुंढे यांची तातडीने बदली व्हावी असे वातावरण तयार केले जाते. (Food and Drug) आणि घडतेही तसेच. करप्ट अधिकाऱ्यांच्या गर्दीत एक नॉन करप्ट अधिकारी फार काळ राहू शकत नाही असे म्हणतात. मुंढे हे त्याला अपवाद नाहीत. अन्न व औषध प्रशासन विभाग हा तसा सर्वसामान्य जनतेला फारसा परिचित नाही. वास्तविक हा विभाग सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी संबंधित आहे, त्या विभागाच्या कार्यप्रणालीची माहिती सर्वसामान्य जनतेला असणे गरजेचे आहे.

खाद्यपदार्थ कोणताही असो. तो उघड्यावरचा असो किंवा पॅकेज मध्ये मिळणारा असो. त्या खाद्यपदार्थात कोणते घटक असतात? हे घटक आरोग्याला मारक असतात की तारक असतात? या खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट कधीची असते? हे बहुतांशी लोकांना माहीत नसते किंवा माहिती करून घेण्याची त्यांच्याकडे तत्परता नसते. खाद्यपदार्थ तयार करून ते उघड्यावर किंवा आकर्षक वेस्टनामध्ये विकले जातात. (Food and Drug) बऱ्याचशा खाद्यपदार्थांमध्ये घातक घटकांची भेसळ केली जाते. हे घटक माणसाच्या आरोग्याला घातक असतात. तुकाराम मुंढे हे या अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुख बनल्यानंतर, हा विभाग गेल्या महिन्यापासून सर्वात जास्त चर्चेत आलेला आहे आणि त्याला कारण ठरले आहेत ते तुकाराम मुंडे आणि त्यांची काम करण्याची पद्धत!

रामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनांवर मुंढे यांनी पहिल्यांदा धाड टाकली आणि ते एकदम चर्चेत आले. त्यांनी आपल्या संपूर्ण विभागाला मोटिवेट केले. कार्यप्रवण केले. आणि त्यामुळे राज्यातील भेसळ माफिया चांगलेच अडचणीत आले. प्रतिबंधित तंबाखू शी संबंधित उत्पादने तयार करणाऱ्यांना आणि अशा उत्पादनांचे व्यसन असलेल्या मंडळींना ममोका कायद्याखाली‌ आणण्याचा निर्धार केल्यानंतर सुगंधी तंबाखू, गुटखा, मावा तयार करणारे आणि त्याचे सेवन करणारे सगळेच हादरले आहेत. भाविकांची गर्दी असलेल्या मंदिर परिसरातील मिठाई विक्रीची दुकाने गायब झालेली आहेत. कोणत्याही क्षणी मुंडे यांचे अधिकारी येथील आणि मिठाईचे नमुने घेऊन जातील अशी धास्ती घेतलेल्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद करण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतलेला आहे.

खाद्य पदार्थांचा थेट संबंध सामान्य माणसाच्या आरोग्याशी असतो. आणि मी तरी सामान्य माणसाच्या आरोग्याशी कोणालाही खेळू देणार नाही असा निर्धार तुकाराम मुंढे यांनी केलेला आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यात एकाच वेळी छापे टाकून कृत्रिम दुधाची निर्मिती करणारे अड्डे उध्वस्त केले आहेत. डिटर्जंट पावडर, शाम्पू, पाम तेल याचा वापर करून कृत्रिम दूध निर्मितीचा उद्योग या पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. तुकाराम मुंढे हे या अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख म्हणून आल्यानंतर अशा प्रकारचे कृत्रिम दूध निर्मितीचे उद्योग या विभागातील अधिकाऱ्यांना दिसलेले आहेत. सामान्य जनतेच्या आरोग्याची अत्यंत घातक असा खेळ या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता.

राज्यात खाजगी व सहकारी संस्थांच्या वतीने संकलित केले जाणारे दूध आणि प्रत्यक्ष मागणी यात मोठी तफावत आहे. त्याचाच फायदा कृत्रिम दूध निर्मिती करणाऱ्या माफीयांनी घेतला आहे. (Food and Drug) त्यांच्याकडून अशा प्रकारचे बनावट दूध ग्राहकांना विकले जाते. आता त्याला आळा बसेल.बनावट खवा अनेक ठिकाणी तयार केला जात होता, अनेक ठिकाणी बनावट पनीर तयार केले जात होते.अशा उद्योगांवर अन्न व औषध प्रशासनाने धाडी टाकण्याचे सत्र सुरू केले आहे. तुकाराम मुंढे यांची बदली व्हावी यासाठी भेसळ माफीयांनी देव पाण्यात घातले आहेत. पण मुंढे यांची बदली करण्याचे धाडस महायुती सरकार करणार नाही अशी अपेक्षा करूया.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?