शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या NDA प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोर धरत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटी, (Sharad Pawar) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची घेतलेली भेट यामुळे या चर्चांना आणखी उधाण आले होते. मात्र आता खुद्द शरद पवार यांनीच या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीदरम्यान काही जिल्हाध्यक्षांनी पक्ष NDAसोबत जाणार आहे का, असा थेट सवाल शरद पवार यांना केला. यावर शरद पवार यांनी आपण विरोधातच आहोत, (Sharad Pawar) त्यामुळे कुणीही संभ्रमात राहू नये, असा स्पष्ट संदेश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर केवळ राजकीय भूमिका मांडून थांबायचे नाही, तर गरज पडल्यास रस्त्यावर उतरूनही लढा द्यायचा आहे, असे निर्देशही पवारांनी जिल्हाध्यक्षांना दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या या भूमिकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे. दुसरीकडे, भाजपकडून शरद पवारांच्या NDA प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पवार महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला.मात्र भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पवारांच्या भूमिकेवर वेगळ्या पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शरद पवार यांचा राजकीय इतिहास पाहता ते पूर्वेला जायचे असेल तर पश्चिमेला सांगतात, असे म्हणत त्यांनी पवारांच्या राजकीय भूमिकेबाबत संशय व्यक्त केला.
शरद पवारांनी जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत दिलेल्या स्पष्ट संदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चांना सध्या तरी ब्रेक लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रमही काही प्रमाणात दूर झाल्याचे मानले जात आहे.मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षांत झालेल्या राजकीय घडामोडी पाहता कोणतीही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. विशेषतः शरद पवारांच्या राजकारणातील डावपेच नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. (Sharad Pawar) त्यामुळे पवारांनी सध्या NDAसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी पुढील काळात त्यांच्या राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा :
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ?
सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार?