नाशिकच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. (expels )उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर त्यांचे पक्षविरोधी वक्तव्य समोर आलं आणि अखेर आज अधिकृतपणे पक्षातून हकालपट्टी जाहीर करण्यात आली.बडगुजर यांनी पक्ष संघटनेतील बदलांबाबत नाराजी व्यक्त केली होती. “मीच नाही, तर 10 ते 12 कार्यकर्ते नाराज आहेत. आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही,” असा आरोप त्यांनी केला होता.
विशेष म्हणजे, त्यांनी संजय राऊत यांच्यावर वैयक्तिक आरोप न करता संघटनात्मक व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली होती. तरीही, त्यांच्या वक्तव्यांचा पक्षविरोधी भूमिकेमध्ये समावेश करत उद्धव ठाकरे यांनी थेट हकालपट्टीचा आदेश दिला.सुधाकर बडगुजर यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, (expels )“एका व्यक्तीच्या नाराजीमुळे संपूर्ण शिवसेना हादरणार नाही. शिवसेना म्हणजे कोणतीही एक व्यक्ती नाही. ज्यांना फक्त फायदे हवे आहेत, ते लोक पक्ष सोडत आहेत.”
मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर बडगुजर भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी सूचक वक्तव्य करत सांगितलं की, “अनेक नाराज पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत, आणि नाशिकमध्ये मोठे बदल घडू शकतात.(expels )”दरम्यान, बडगुजर म्हणाले की, पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली, खासदार निवडून आणला, तरीही आवाज ऐकून घेतला जात नाही. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह अनेक जण नाराज आहेत. तसेच सुधारणेची मागणी अनेकदा केली, पण ती ऐकली जात नाही.
हेही वाचा :