सणासुदीचा काळ सुरू असल्याने सोने-चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांकडून बाजारभावाची माहिती घेतली जात आहे. (gold and silver) अशातच जळगावच्या सराफ बाजारातून आजचे सोने-चांदीचे ताजे दर समोर आले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात आज चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या २४ तासांत चांदी तब्बल २ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. (gold and silver) त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज जीएसटीसह चांदीचा दर २ लाख ४४ हजार ११० रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.दुसरीकडे, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी सोन्याच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ५७ हजार ५९० रुपये इतका स्थिर आहे. त्यामुळे आज सोन्याच्या दरात वाढ किंवा घट झालेली नसल्याने खरेदीदारांना दरातील बदलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दागिन्यांची आणि गुंतवणुकीसाठी मौल्यवान धातूंची मागणी वाढते. (gold and silver) मात्र दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या बदलामुळे ग्राहकांना खरेदीचे योग्य नियोजन करावे लागत आहे. आज चांदीच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरली असली, तरी सोन्याचे दर अद्याप उच्च पातळीवर कायम आहेत.त्यामुळे तुम्ही आज सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारातील ताजे दर, जीएसटी आणि दागिन्यांवरील मेकिंग चार्जेस यांचा विचार करूनच अंतिम खरेदी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ?
सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार?