मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सह-संयोजक आणि प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले सौरभ दास आजारी पडले असून, त्यांना डेंग्यू झाल्याची माहिती आहे. (resignation) त्यामुळे आंदोलनाच्या तयारीत आणि प्रत्यक्ष आंदोलनात त्यांना काही दिवस सहभागी होता येणार नसल्याची शक्यता आहे.

सौरभ दास यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. “पुढे चला, लढत चला. मीही येतो, पण डेंग्यू झाला आहे,” असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दास यांच्या या पोस्टवर सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया देत त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.याआधी सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. ही मागणी मान्य न झाल्यास २ ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. या आंदोलनाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्याची भूमिका सीजेपीने घेतली आहे.
मात्र, आता आंदोलनाच्या नियोजित ठिकाणाबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क येथे २ ऑक्टोबरला आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्याचा दावा अभिजीत दीपके यांनी केला आहे. परवानगी न मिळाल्यास ‘जेल भरो आंदोलन’ करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (resignation) त्यामुळे येत्या काही दिवसांत आंदोलनाचे स्वरूप आणि ठिकाण याबाबत आणखी स्पष्टता येण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि एसआयआरशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर सीजेपी आक्रमक झाली आहे. पक्षाने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित काही मागण्या मांडल्या आहेत. (resignation) दरम्यान, एसआयआरशी संबंधित निर्णयांवर निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देताना संबंधित सर्व निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरूनही राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा सुरू आहे
हेही वाचा :
बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?
MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ?