पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बोपदेव घाटात विद्यार्थ्यांच्या घोळक्यात आयशर टेम्पो घुसला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पुण्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्यातील बोपदेव घाट परिसरात बसची वाट पाहत बस थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात भरधाव आयशर टेम्पो घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील बोपदेव घाट परिसरात काही विद्यार्थी बस थांब्यावर बसची वाट पाहत उभे होते. (accident) याचवेळी अचानक एक आयशर टेम्पो विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला. टेम्पोची धडक इतकी भीषण होती की, या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या अपघातामुळे बस थांब्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (accident) त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, टेम्पोचा वेग किती होता आणि अपघातामागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास केला जात आहे. या अपघातातील मृत विद्यार्थी आणि जखमींची सविस्तर ओळख (accident) तसेच अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बोपदेव घाट परिसरात घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित
कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच
नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट