त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने राहणार बंद

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळाच्या कामांसाठी त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन अडीच महिने बंद ठेवण्याचा प्रस्ताव करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव केला (Trimbakeshwar) असून गर्दीमुळे बांधकामात अडथळे आणि सुरक्षेचा धोका लक्षात घेता मंदिर बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र, नित्यपूजा अखंडित सुरू राहणार असून, संयुक्त पाहणीनंतर या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणार आहे.

सिंहस्थापूर्वी मंदिरात स्वतंत्र प्रवेशमार्ग आणि दर्शन रांग उभारण्याचे काम सध्या दोन शिफ्टमध्ये सुरू आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भाविकांची मोठी गर्दी असल्याने बांधकाम साहित्य आणि अवजड यंत्रसामग्रीच्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. (Trimbakeshwar) गर्दीमुळे भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काम निर्धारित वेळेत पूर्ण होईपर्यंत मंदिरातील नियमित, सशुल्क आणि विशेष दर्शन अडीच महिन्यांसाठी स्थगित ठेवण्याची MSIDC ची विनंती आहे. दर्शन स्थगित ठेवले तरी मंदिरातील नित्यपूजा अखंडित सुरू राहणार आहे. देवस्थानने नियुक्त केलेल्या पुरोहितांनाच सुरक्षित मार्गाने प्रवेश देण्याचा प्रस्ताव आहे.

याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. जिल्हा प्रशासन, कुंभमेळा प्राधिकरण आणि पोलिसांच्या संयुक्त पाहणीनंतर लेखी निर्णय अपेक्षित आहे. काम पूर्ण झाल्यावर प्रवेशमार्ग आणि आपत्कालीन मार्गाची सुरक्षितता तपासल्यानंतरच भाविकांसाठी दर्शन पुन्हा सुरू करण्याची MSIDC ची भूमिका आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन बंद ठेवण्याच्या प्रस्तावामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण, जिल्हा प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यासंदर्भात आता त्र्यंबकेश्वर मंदिर बंदच्या निर्णयावर विश्वस्तांचं स्पष्टीकरण आले आहे. आज दुपारी चार वाजता विश्वातांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात आहे. MSIDC ने दोन दिवसापूर्वी मंदिर बंद ठेवण्याचे पत्र दिले. त्र्यंबकेश्वर रोड, घाटांची कामे, अंतर्गत रस्ते सर्व काम ताबडतोब सुरू केल्याने कामामध्ये सुसूत्रता राहिली नाही त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. (Trimbakeshwar) यामुळे भाविकांची मोठी अडचण झाली आहे त्यांना व्यवस्था कळत नाहीये याचा त्रास भाविकांना होत आहे आहे. ‘शासनाला आमचा निर्णय आम्ही कळविलेला आहे भाविक आणि देव यांच्यात आम्ही येणार नाही. आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत मंदिर बंद ठेवायचे असेल तर ठराविक काळात कामांचे नियोजन कसे होणार याचा मास्टर प्लॅन आम्हाला द्यावा यानंतर निर्णय घेऊ.’, असे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट