लाडक्या बहिणींना नव्याने ई-केवायसी करावी लागणार सरकारने दिली महत्वाची अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सध्या संभ्रमावस्थेत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नवीन ई केवायसीबाबत सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट आणि मेसेज व्हायरल होत आहे. (Ladki Bahin Yojana) त्यामुळे आता पुन्हा ई-केवायसी करावी लागणार की काय? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लाडक्या बहिणी चिंतेत आल्या आहेत. पण या पोस्टमागचे सत्य समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट खोटी आहे. नवीन ई-केवायसीबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी लाभार्थी महिलांना केले आहे.

लाडकी बहीण योजनेची नवीन ई केवायसी प्रक्रिया सुरू झाल्याच्या खोट्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Ladki Bahin Yojana) व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवर बनावट लिंक पाठवून वैयक्तिक माहिती भरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, शासन स्तरावर असा कोणताही निर्णय झालेला नसून या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी केले आहे.

व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवरील अनोळखी लिंकवर क्लिक करून वैयक्तिक आणि बँकेशी संबंधित माहिती न भरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाचे लाभार्थी महिलांना केले आहे. पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरण द्वारे निधी मिळत आहे. (Ladki Bahin Yojana) त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा बँक खात्याची माहिती भरून आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, लाडक्या बहिणी सध्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या हप्त्याचे ३००० रुपये कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. नोव्हेंबर महिना संपत आला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. लाडकींना हे पैसे कधी दिले जाणार याबाबत देखील सरकारने अद्याप काहीच माहिती दिली नाही. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लाभार्थींच्या बँक खात्यावर डीबीटी पद्धतीने पैसे जमा केले जातात.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट