बंडखोर खासदारांना मोठा धक्का बसला. पश्चिम बंगालमध्ये भाजपने अचानक बंडखोरांची साथ सोडली. (elections) त्यांनी आगामी निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगालमध्ये महापालिका निवडणूक होणार आहेत. भाजपने तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांना मोठा झटका दिला आहे. भाजपने ही निवडणूक कोणत्याही युतीशिवाय लढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये कोलकाता महापालिका, हावडानगर महापालिकेची निवडणूक होणार आहे. परंतु निवडणुकीच्या तारखेची घोषणा झालेली नाही. या निवडणुकीत बंडखोरांचा गट देखील उतरण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी बंडखोरी केली. (elections) त्यानंतर हा गट नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडिया पक्षात विलीन झाला होता. यात सायोनी घोष, काकोली घोष दस्तीदार,युसूफ पठाण, सुदीप बंदोपाध्याय यांच्या नावाचा समावेश आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य म्हणाले, ‘पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकीत भाजप कोणाशीही युती करणार नाही. कोलकाता आणि हावडानगर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार आणि जिंकणार. दिल्लीत NCPI सोबत एखादा करार होऊ शकतो. परंतु दिल्ली आणि कोलकातामध्ये 1500 किलोमीटरचं अंतर आहे’. भाजपच्या एका नेत्याने म्हटलं की, पक्ष स्वत:ची संघटना, नेते, कार्यकर्त्यांवर विसंबून राहू इच्छित आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर आमची पहिली निवडणूक आहे. राष्ट्रीय राजकारणात फरक असतो. NCPI ने जरी भाजपशी हातमिळवणी केली. परंतु पक्षात टीएमसीचे माजी नेते आहेत. भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधातच निवडणूक लढली होती. मागच्या निवडणुकीत काहींचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्यासोबत हातमिळवणी केली, तर चुकीचा संदेश जाईल’.
दस्तीतर यांच्यासहित दिल्लीत सर्व बंडखोर खासदारांची बैठक झाली होती. यात सायोनी घोष यांच्या नावाचाही समावेश आहे. निवडणुकीआधीच कोलकाता आणि हावडानगर महापालिकेच्या मतदारसंघ पुनर्रचनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोलकातामध्ये वॉर्डची संख्या 209 इतकी होईल. आता कोलकातामध्ये 144 वॉर्ड आहेत. तर हावडानगरमधील 50 वॉर्डची संख्या ही 68 होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस देखील महापालिका निवडणुकांची तयारी करत आहेत. (elections) त्यांच्या पक्षाचे कुणाल घोष यांनी म्हटलं की, आम्ही तयार आहोत. आम्ही चांगली कामगिरी करू. मतदारसंघ पुनर्रचनेबाबत आम्हाला आक्षेप असून सर्व लोकसंख्येच्या आधारावर केले पाहिजे. परंतु भाजप मतदारांचा विचार करून पुनर्रचना करत आहेत, असा आरोप घोष यांनी केला.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?
एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?
कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?