वसंत डावखरे प्रकरणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
गेल्या 17 वर्षापासून राज्यात दिवंगत नेते वसंत डावखरे प्रकरण चर्चेत होते. या प्रकरणाचा आज अंतिम निकाल समोर आला आहे. या प्रकरणातील कथित आरोपी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी 20 पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे VCद्वारे जबाब नोंदवला होता. आता अंतिम निकालात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची निर्दोष सुटका करण्यात आली.

2009 लोकसभा निवडणुकीनंतर दाखल झालेल्या मानहानी प्रकरणाचा आज निकाल लागला. कल्याण न्यायालयाने उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांची निर्दोष मुक्तता केली. (acquitted) त्यानंतर आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “17 वर्षांनंतर आम्हाला न्याय मिळाला, याचा आनंद आहे,” असे ते म्हणाले. स्वर्गीय वसंत डावखरे यांच्याबद्दल आदर कायम असल्याचे परांजपे यांनी स्पष्ट केले.
दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर कल्याण न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे. साक्षी, पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद तपासल्यानंतर हा निकाल आला आहे. प्रकरण राजकीय हेतूने दाखल करण्यात आल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद. (acquitted) काही साक्षींमध्ये विसंगती असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडल्याचे वकील जयेश वाणी यांनी म्हटले. जयेश वाणी उद्धव ठाकरे यांचे वकील होते. निकालानंतर “सत्याचा विजय झाला” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी दिली आहे.
2009च्या लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी लढत होती. (acquitted) यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडीओ दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते. या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद पराजंपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर वसंत डावखरे यांनी खटला दाखल केला होता. आता या प्रकरणी त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली.
हेही वाचा :
दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले?
विसर्जनापूर्वी गणरायाच्या कानात म्हणा, सर्व इच्छा होतील पूर्ण?