रविवारीही बँका सुरूच राहणार, सरकारने घेतला तातडीने निर्णय, मोठं कारण समोर?

सर्वसामान्यपणे बँकांना रविवारी आठवडी सुट्टी असते. परंतु या आठवड्यात मात्र असं घडणार नाहीये, 27 सप्टेंबर रोजी रविवारी देखील बँका सुरूच राहणार आहेत. सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

सर्वसामान्यपणे बँकांना रविवारी आठवडी सुट्टी असते. (banks) परंतु या आठवड्यात मात्र असं घडणार नाहीये, 27 सप्टेंबर रोजी रविवारी देखील बँका सुरूच राहणार आहेत. सरकारने या आठवड्यात रविवारी देखील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बँकांच्या वतीने 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. या काळात ग्राहकांची गैरसोय होऊ शकते, ती टाळण्यासाठी आता सरकारने येत्या रविवारी देखील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सर्व राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच ग्रामीण बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. बँक कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बाबत माहिती देताना अर्थमंत्रालयाने म्हटलं की, युनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियंस (UFBU) कडून येत्या 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. या संपामुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. (banks) त्यामुळेच ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आता सरकारने रविवारी देखील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

आपल्या विविध मागण्याच्या पार्श्वभूमीवर युनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियंसच्या वतीने तीन दिवसांच्या संपाचा इशारा देण्यात आला आहे. बँकिंग कामकाजाचा आठवडा हा पाच दिवसांचा करावा ही त्यांची मुख्य मागणी आहे. या संदर्भात सरकारची युनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियंससोबत बैठक पार पडली, परंतु या बैठकीमध्ये कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाहीये. सरकारने जर आमच्या मागण्यांबाबत काही निर्णय घेतला तर आम्ही संप मागे घेऊ असं देखील युनाइटेड फोरम ऑफ बँक यूनियंसने म्हटलं आहे. परंतु तोडगा निघू शकला नसल्याने आता तीन दिवसांच्या संपाची शक्यता आहे. (banks) त्यामुळे आता रविवारी देखील बँका सुरूच राहणार आहे. तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांनी त्या आधीच आपली कामं उरकून घ्यावीत.

हेही वाचा : 

दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले?

विसर्जनापूर्वी गणरायाच्या कानात म्हणा, सर्व इच्छा होतील पूर्ण?

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये दुष्काळ जाहीर करा?