दुबईहून तेल अवीवकडे जाणारे एक विमान साैदी अरेबियाच्या हवाई हद्दीत असतानाच थेट परत फिरल्याचे वृत्त आले. (airspace) यासोबतच या विमानाकडून असे काही संदेश पाठवण्यात आली, ज्याने खळबळ उडाली. या विमानाचे अपहरण झाल्याचे संदेश पाठवले.

दुबईहून तेल अवीवकडे जाणारे एक विमान साैदी अरेबियाच्या हवाई हद्दीत असतानाच थेट परत फिरल्याचे वृत्त आहे. आर्मी रेडिओने दिलेल्या माहितीनुसार, या विमानाने विमान अपहरण झाल्याच्या प्रयत्नाशी संबंधित आपत्कालीन संकेत जारी केला. मदतीसाठीचा संदेश (डिस्ट्रेस सिग्नल) पाठवला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. FZ1073 ने सुरुवातीला 7700 हा संकेत दिला होता, हा संदेश आपत्कालीन परिस्थितीमध्ये पाठवला जातो. (airspace) त्यानंतर पुन्हा तो बदलून थेट 7500 हा संदेश पाठवला. बेकायदेशीर हस्तक्षेप दर्शवणारा हा संदेश आहे. त्यानंतर परत एकदा विमानाने 7700 या संकेत पाठवला. या विमानाबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती. या विमानाचे अपहरण झाल्याचे सांगितले जात होते.
हेच नाही तर सुरुवातीच्या वृत्तांमध्ये वैमानिकांमधील झटापटीचा उल्लेख आहे. नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री यांच्यात बैठक झाली. या घटनेने जगात मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात एकूण 180 प्रवासी होते आणि त्यापैकी 150 प्रवासी इस्रायली असल्याचीही माहिती मिळतंय. विमानाने साैदी अरेबियाहून जाताना अचानक आपला रस्ता बदलला.
त्यानंतर आपत्कालीन संदेशही पाठवला. त्यानंतर थेट हे विमान साैदी अरेबियाच्या ताबुक विमानतळावर सुरक्षित उतरले. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने सर्वात अगोदर 7700 कोड पाठवला. त्यानंतर विमानाने 7500 कोड पाठवला. हा कोड अपहरणसंदर्भात पाठवला जातो. (airspace) त्यानंतर हे विमान साैदीकडे गेल्याचे कळाले. यासर्व गोष्टी सुरू असतानाच हे विमान ताबुक एअरपोर्टला पोहोचले. लँडिंगनंतर हे विमान फ्लाईट ट्रॅकिंग साइट्सवर दिसले नाही.
इस्त्रायलच्या सुरक्षा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आणीबाणीची स्थिती आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाचे संकेत देणारा सिग्नल पाठवण्यामागे विमानावरील वैमानिकांमधील वाद हे कारण असू शकते. मात्र, याबाबत अजून अधिकची माहिती काही मिळू शकली नाही. या घटनेनंतर, इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमाने त्या विमानाकडे रवाना करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. त्या विमानावर लक्ष ठेवण्यासाठी इस्रायली लढाऊ विमाने पाठवण्यात आली.मात्र, या घटनेने एकच मोठी खळबळ उडाली.
हेही वाचा :
२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का प्रमुख नेत्याला डेंग्यू?
UPI व्यवहारांवर चार्जेस सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं दिलासा की?