कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इतर दोन आयुक्तांनी भूमिका घेऊन निवडणूक आयोगामधील वाद मीडिया पर्यंत पोहोचेल याचे पद्धतशीर नियोजन केल्यानंतर महाराष्ट्रासह देशभर मुख्य आयुक्तांच्या विरोधात विरोधी पक्ष नेत्यांनी जोरदार आवाज उठवून राजकीय रान उठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करताना आपणाकडून भाषा सभ्यतेचे अपहरण होत आहे याचे भान संबंधितांना राहिलेले दिसत नाही.

उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि भाषा सभ्यता यांचा परस्पराशी काडीमात्र संबंध नसल्याचे गेल्या काही वर्षात वारंवार सिद्ध झाले आहे. सत्ताधाऱ्यांची पार्लमेंट ही रखेल आहे. अमित शहा हे दलाल आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अमित शहा यांच्या हातचे बाहुले आहेत. हे भडवे आहेत ते फालतू आहेत. मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही. आता त्यांनी पाय उतार व्हावे. (Commission) अशा प्रतिक्रिया ते वेळोवेळी देत आले आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने लोकशाही धोक्यात आणली आहे. मत चोरून सरकार बनवले आहे. हे त्यांचे नेहमीचे आवडते वाक्य आहे आणि त्याला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना मती चोर म्हणजे त्यांची मती चोरीस गेली आहेअसे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे, यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर रोष व्यक्त करताना शासनाला अर्थात भाजपला झोडपून काढले आहे. भाजपने मते चोरून सत्ता प्रस्थापित केली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. (Commission) त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मेंदू चोरीस गेले आहेत अशी जहाल टीका केली आहे. महाराष्ट्रात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात एक मोठे आंदोलन उभे करण्याच्या हालचाली ठाकरे बंधूंच्याकडून सुरू आहेत. एस आय आर हा मुद्दा घेऊन ते आंदोलनात उतरणार आहेत. विरोधकांना आंदोलन करण्याचा आणि शासनाला अडचणीत आणण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी राबवला पाहिजे.
निवडणूक आयोगामधील गंभीर स्वरूपाचे मतभेद पुढे आल्यानंतर देशभर त्याचे पडसाद उमटणार हे अपेक्षित आणि अभिप्रेत आहे. ज्ञानेश कुमार यांनी कशाप्रकारे मनमानी केली, त्यांनी घेतलेले निर्णय एकतर्फी कसे आहेत हे जाणून घेण्याचा या देशातील जनतेला हक्क आहे. आणि म्हणूनच सुखविंदर संधू आणि विवेक जोशी या दोन आयुक्तानी त्याबद्दलची अधिकृत माहिती देशाला दिली पाहिजे. कारण निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे आणि तो थेट जनतेशी संबंधित आहे. ज्ञानेश कुमार यांनी खुलासा केला आहे मात्र त्यावर सहकारी असलेल्या दोन आयुक्तांनी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. त्यांचे हे मौन लोकशाहीसाठी हितकारक नाही.
निवडणूक आयोगामध्ये सर्व काही आलबेल नाही हे संधू आणि जोशी या दोन आयुक्तांनी सुचित केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या कर्तव्य आचार्य संहितेमध्ये या दोन आयुक्तांचे वर्तन बसते का हा संशोधनाचा विषय असला तरी त्यांनी अतिशय महत्त्वाच्या गंभीर विषयाला तोंड फोडले आहे. आणि त्याचा फायदा देशातील विरोधी पक्षांकडून नक्कीच घेतला जाईल. सत्ताधाऱ्यांसमोर एक प्रबळ विरोधी पक्ष उभा आहे. (Commission) त्यांनी मिळालेल्या संधीचा सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावीपणे फायदा घेतला पाहिजे. निवडणूक आयोगामधील वादाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे.
विरोधकांचा मेंदू चोरीला गेला आहे ही भाषा मात्र असंसदीय नसली तरी भाषा सभ्यता सोडून आहे.एक मात्र गोष्ट स्पष्ट झाली आहे की, ज्ञानेश कुमार यांच्यामुळे भारतीय जनता पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी मुख्य आयुक्तांचा वापर करून घेण्यात आलेला आहे, मोठ्या प्रमाणावर मत चोरी झालेली आहे या विरोधकांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना एक प्रकारचे नैतिक बळ मिळालेले आहे असे म्हणता येऊ शकेल.
हेही वाचा :
२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का प्रमुख नेत्याला डेंग्यू?
UPI व्यवहारांवर चार्जेस सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं दिलासा की?