गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी दरात अचानक घसरण होत आहे, तर कधी मोठी वाढ होत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. (gold and silver) अशातच आज जळगावच्या सराफ बाजारातून सोने-चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात तब्बल एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या या वाढीनंतर जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ५२ हजार ९५५ रुपयांवर पोहोचला आहे. (gold and silver) त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे.
दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदीच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाल्याने जीएसटीसह चांदीचा भाव २ लाख ३३ हजार ८१० रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने अस्थिरता पाहायला मिळत असून, दरांमध्ये होणाऱ्या या चढ-उतारामुळे सराफ बाजारातील व्यवहारांवरही परिणाम होत आहे. (gold and silver) त्यामुळे आगामी काळात सोने-चांदीचे दर कोणत्या दिशेने जातात, याकडे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का प्रमुख नेत्याला डेंग्यू?
UPI व्यवहारांवर चार्जेस सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं दिलासा की?