ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी सरकारकडन व्याजदरांची घोषणा करण्यात आली आहे. (interest) गेल्यावेळी सरकारने व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता. जाणून घ्या नवीन व्याजदर

जर तुम्ही अल्पबचत योजनेत गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2026 च्या तिमाहीसाठी व्याजदरात कोणताही बदल केला नाही. वित्त मंत्रालयाने याविषयीची अधिसूचना दिली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 च्या तिसऱ्या तिमाहीत 1 ऑक्टोबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत विविध अल्पबचत योजनेचे व्याजदर जुलै-सप्टेंबर या तिमाहीप्रमाणे कायम आहेत. यावेळी कोणतीही कपात न करता व्याजदर कायम ठेवल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) इतर सरकारी बचत योजनेतील गुंतवणूकदारांना पूर्वीप्रमाणेच परतावा मिळत राहणार. सध्याच्या व्याजदरानुसार, पीपीएफवर 7.1 टक्के वार्षिक व्याजदर मिळेल. मुलींच्या भविष्यासाठी लोकप्रिय सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2 टक्के व्याजदर मिळेल. सध्या हा सर्वात आकर्षक व्याजदर मानल्या जात आहे. याशिवाय, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामधील (NSC) गुंतवणुकीवर 7.7 टक्के व्याजदर मिळत राहणार आहे. (interest) ज्यांना जोखीम नको आणि सुरक्षित परतावा हवा ते गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करतात. अनेक कुटुंब या योजनेत दरवर्षी गुंतवणूक करतात. सरकार या योजनांना आर्थिक सुरक्षा देते. त्यांची हमी घेते. यामध्ये पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), एनएससी, पोस्ट ऑफिस ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरीक अल्पबचत योजनेचा समावेश आहे.
व्याजदर स्थिर ठेवल्याने गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळेल. बदलता व्याजदर या योजनांना आकर्षक बनवेल. गुंतवणूकदारांना गुंतवणूक आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाला मदत होईल. अल्पबचत योजनांच्या व्याजदराची निश्चिती दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन करण्यात येते. (interest) आता ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. पीपीएफवर 7.1 टक्के वार्षिक व्याजदर तर सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 7.7 टक्के व्याजदर मिळत राहणार आहे. सरकारने व्याजदरात कोणतीही कपात केलेली नाही. व्याजदर कायम ठेवला आहे.
हेही वाचा :
बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती