खुशखबर रक्षाबंधनापासून महिलांच्या खात्यात दरमहा ₹2500 येणार?

सरकार नेहमीच महिलांसाठी विविध योजना राबवत असतं. त्यामुळे महिलांना या महागाईत आर्थिकदृष्ट्‍या सक्षम व्हायला मदत मिळते. सध्या महिला समृद्धी योजनेची जोरदार चर्चा महिलांमध्ये सुरू आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर ही योजना सुरू करण्याची तयारी सरकार करत आहे. (women) यामध्ये महिलांना दरमहा २५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. योजनेची अधिकृत घोषणा लवकरच होईल. २८ ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होऊ शकतो. अशी माहिती प्रशासनातल्या सुत्रांकडून मिळालेली आहे.

महिला समृद्धी योजनेचा लाभ २१ ते ६० वर्षे वयोगटातल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना मिळणार आहे. यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखे ते तीन लाखांपर्यंत असणं आवश्यक आहे. जास्त नको. तसेच रेशन कार्डधारक महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. (women) पण सरकारी नोकरी करणाऱ्या, आयकर भरणाऱ्या, सरकारी पेन्शन घेणाऱ्या किंवा चारचाकी वाहन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही योजना दिल्ली सरकार राबणार आहे. तिथल्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच या योजनेसाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ५११० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेचा फायदा २० ते २२ लाख महिलांना होणार आहे, असा सरकारचा अंदाज आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी याआधी सांगितलं होतं की, योजना पूर्ण तयारीनिशी लागू करण्यात येईल, जेणेककरून प्रत्येक पात्र महिलेला त्याचा लाभ मिळेल. (women) ज्या महिलांना या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्ज करताना आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख, लिंग, आई-वडिलांचं नाव, वैवाहित स्थिती, मोबाईल क्रमांक, ई-मेल, वास्तव्याचा कालावधी आणि आधारशी लिंक असलेले बँक खातं याची माहिती द्यावी लागेल.

हेही वाचा :

इचलकरंजी बनली चिखलकरंजी नागरिक संतप्त महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश?

नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा कृष्णामाई दत्तगुरूंच्या भेटीला भाविकांची स्नानपर्वणी?

E20 पेट्रोलमुळे गाडीचे इंजिन खराब होणार का?