देशातील कोट्यवधी अन्नदात्यांसाठी आनंदवार्ता आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. याविषयीची मोठी अपडेट समोर येत आहे.

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अजून एक आनंदवार्ता आली आहे. राज्यात भीषण दुष्काळाचे सावट आहे. सरकारने दुष्काळी उपाय योजना सुरू केलेल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीत तिसर्या यादीतील कास्तकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Farmers) आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची मोठी अपेडट समोर आली आहे. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार दरवर्षी 6 हजार रुपये जमा करते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा करण्यात येते. सध्या शेतकरी या योजनेत 24 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या महिन्यात दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता यापूर्वीचा 23 वा हप्ता हा 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. पीएम किसान योजनेच्या दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचे अंतर असते. सध्या देशभर दुष्काळाचे सावट आहे. राज्यातही जवळपास सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. (Farmers) त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. दसरा-दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. याविषयीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण या महिन्याच्या अखेरच्या हप्त्यात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
अगोदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा पीएम किसान योजनेत ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा होणार नाही. शेतकऱ्यांनी वेळेपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सोबतच शेतजमिनीचा पडताळा, आधार लिकिंग आणि दस्तावेजातील नावातील चूक हे लागलीच दुरूस्त करणे आवश्यक आहे. यापूर्वीचा हप्ता अडकला असेल तर pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन फार्मर कॉर्नरवर लॉगिन करणे आवश्यक आहे. ‘Know Your Status’ हा पर्याय निवडून स्टेट्स चेक करा. (Farmers) त्यात ‘Land Seeding’ वा ‘e-KYC’ समोर ‘No’ असे समोर आल्यास तात्काळ CSC केंद्रावर जाऊन ती माहिती अपडेट करा. तुम्ही ही माहिती घरबसल्याही अपडेट करू शकता. फार्मर कॉर्नरवर एडिट अथवा अपडेट आधार, बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा. तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC क्रमांक टाकावा. त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करावा. त्यानंतर ही माहिती सबमिट करावी.
हेही वाचा :
बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती