10 ते 12 महिलांची तक्रार श्वेता महालेंचा सूचक इशारा संजय गायकवाडांच्या अडचणी वाढणार

भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. १० ते १२ महिलांनी तक्रार केल्याचा दावा करत, महालेंनी गायकवाडांना आव्हान स्वीकारले आहे. तक्रारदार महिलांवर दबाव येत असूनही, महाले DIG यांना भेटून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत.

शिवसैनिक महिलांना माझ्या घरातून मेसेज जात असल्याचा पुरावा दिला, तर मग माझ्या स्वभावाप्रमाणे मी काय करायचे ते करेल, असं आव्हान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना दिलं होतं. श्वेता महाले यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे. माझ्याकडे 10 ते 12 महिलांची तक्रार आली आहे.(problems) इतर महिलाही तक्रार करण्यासाठी येत आहेत. मात्र, त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, असा दावा श्वेता महाले यांनी केला आहे. श्वेता महाले यांनी सूचक इशारा दिल्याने गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वाढली आहे.

भाजपच्या आमदार श्वेता महाले मीडियाशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी हा सूचक इशारा दिला. नीचपणा कोण करतंय ते दिसतंय. माझ्याकडे 10 ते 12 महिलांनी तक्रार केली. (problems) आणखी काही महिलांना तक्रार करायची आहे. पण दबावामुळे त्या पुढे येत नाहीत. कुठे जाऊ नका. ज्यांनी मेसेज केले, त्यांना आम्ही समज देऊ. त्याला आम्ही योग्य पद्धताने समजून सांगू. पण तुम्ही कुठे जाऊ नका, असं या महिलांना सांगितलं जात आहे. तरीही 10 ते 12 महिलांनी तक्रार केली आहे, असं श्वेता महाले म्हणाल्या.

आम्हाला समाजात राहावं लागत असल्याने फक्त आमचं नाव बाहेर येऊ नये. गोपनियता पाळली पाहिजे, असं या महिलांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना तसा विश्वास दिला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरून या महिलांना मेसेज केले आहेत. पुढच्या आठवड्यात डीआयजींना भेटून याची माहिती देऊ. या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यावर हलकटपणा आणि नीचपणा दिसून येईल, असं श्वेता महाले यांनी सांगितलं.

शिवसेनेच्या महिला आघाडीने तुमच्या विरोधात निवेदन दिलं आहे. त्याचं काय? असा सवाल केला असता त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांच्या नेत्यांच्या दबावामुळे निवेदन दिलं. निवेदन देताना त्या माझ्याशी बोलल्या. निवेदन तुमच्याविरोधात द्यायचं नव्हतं. आईबहिणींवरून आमच्या नेत्यांनी शिव्या दिल्या, (problems) त्यांच्याविरोधात निवेदन देणार होतो. पण आमच्या नेत्यांचा दबाव असल्याने आम्ही तुमच्या विरोधात निवेदन देत आहे, असं या महिलांना मला सांगितलं, असा दावाही त्यांनी केला.

चिखलीचा गाझियाबाद झाल्याची टीका गायकवाड यांनी केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. चिखलीचा गाझियाबाद झाला की नाही हे चिखलीची जनताच सांगेल. चिखली सुसंस्कृत आहे. इथे कुणी दारू पिऊन भररस्त्यात कुणाला शिव्या देत नाही. बुलढाण्यात अवैध धंदे ज्यांचे आहे, ते मोर्चात सहभागी होतात. उलट तेच म्हणतात की, अवैध धंदे बंद झाले पाहिजे, असा हल्लाच त्यांनी केला.

हेही वाचा : 

बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती

शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार