भारत पाकिस्तान सीमेवर खळबळजनक घटना, BSF ची मोठी कारवाई, थेट पाकिस्तानच्या बाजूने

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. त्यातच काही महिन्यांपूर्वीच युद्धाची स्थिती होती. त्यातच आता पुन्हा पाकिस्तान आणि भारत सीमेवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या कुरापती काही कमी होत नाहीत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील अनेक दिवसांपासून तणाव बघायला मिळतो. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मोठा हल्ला केला. थेट धर्म विचारून लोकांना टार्गेट केले. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठे निर्णय घेतले. भारतातून पाकिस्तानमध्ये जाणारे पाणीही त्यांनी बंद केले. यासोबतच भारताने ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानविरोधात राबवले. (India and Pakistan) ज्यात पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी अड्डे भारताने उद्धवस्थ केली. पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. दोन्ही देशात कायमच तणाव राहिला आहे. पाकिस्तानातून भारतात दहशतवादी कारवाया घडवल्या जातात. ज्यानंतर भारताने पाकिस्तानला दणका दिला. मात्र, सीमेवर काड्या करण्याचे काम पाकिस्तानचे सुरूच आहे.

भारत पाकिस्तान सीमेवर मोठ्या घडामोठी घडताना दिसत आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली. पाकिस्तानातून भारतात मोठी घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू होता. तो प्रयत्न भारताच्या सैन्याने हानून पाडला. BSF च्या जवानांनी पंजाबच्या तरनतारन सेक्टरमध्ये भारती पाकिस्तान सीमेवरील घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी केला. भारतात ही घुसखोरी सुरू होती.पाकिस्तानी नागरिकांना थेट मारले. (India and Pakistan) दोघेही रोजोके गावाच्या आसपास घुसखोरीचा प्रयत्न करत होते. मिळालेली अधिकची माहिती अशी की, इंटरनॅशनल सीमा पार करण्याचा प्रयत्न दोन व्यक्ती करत होते.

यादरम्यान BSF च्या जवानांनी त्यांना बघितले. त्यानंतर त्यांना रोखण्यात आले. पण त्यांना थांबण्यास सांगूनही हे थांबले नाहीत. BSF कडून थेट फायरिंग करण्यात आले. ज्यात दोन लोक गेले. या घटनेने मोठी खळबळ उडाली. (India and Pakistan) अशाप्रकारची घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या बाजूने सातत्याने होत आहे. भारताने अनेकदा हा प्रयत्न हानून पाडला. पाकिस्तान आणि भारतात काही महिन्यांपूर्वीच युद्धाची स्थिती होती. दोन्ही देशांकडून मोठे हल्ले केले जात होते. शेवटी दोन्ही देशांमधील उच्च अधिकारी एकत्र बसले आणि त्यांनी यातून मार्ग काढला आणि युद्ध थांबवले. मात्र, अमेरिका आम्हीच हे युद्ध थांबल्याचा दावा करतात. ज्यावर भारताने स्पष्ट भूमिका घेतली. पाकिस्तान युद्ध थांबल्याचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांनाच देते.

हेही वाचा : 

बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती

शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार