“महाराष्ट्र पोलिसांनी आमचं हार्ट ब्रेक केलय. आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस आल्या आहेत. (Abhijeet Deepke) जंतर-मंतरवर आंदोलन होणार आहे, तिथे जाऊ नये म्हणून चंद्रपूर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

“महाराष्ट्र पोलिसांनी आमचं हार्ट ब्रेक केलय. आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस आल्या आहेत. जंतर-मंतरवर आंदोलन होणार आहे, तिथे जाऊ नये म्हणून चंद्रपूर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. दिल्लीत जंतर-मंतरवर जाणार त्याचा खर्च कोण करणार असं विचारलय. आंदोलन हिंसक होणार असं म्हटलय. आता चंद्रपूर पोलिसांना आधीपासून कसं काय माहित आंदोलन हिंसक होणार की यांनी आधीच प्लान करुन ठेवलाय” अशी टीका कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केली. “सोशल मीडियावर एक पोस्ट टाकू नका, (Abhijeet Deepke) ज्याने हिंसा होईल. एक व्हिडिओ दाखवा आम्हाला आम्ही असं केलय. आम्ही नेहमी गांधी, आंबेडकरांबद्दल बोलतोय तुम्हाला ही हिंसा वाटते का?. महाराष्ट्र पोलीस दिल्ली पोलिसांसारखे का वागतायत” असा सवाल अभिजीत दीपके यांनी विचारला.
“चंद्रपूरवरुन दिल्लीला जाण्यासाठी हजार-दीडहजारचं तिकीटही मुलं काढू शकत नाही का?. जंतर-मंतरवर आंदोलनाला जाऊ नका असं सांगता ही हुकूमशाही झालीय. एकीकडे मराठी मुलगा दिल्लीला जाऊन तुम्ही महाराष्ट्र पोलिसांकडून काही शिका असं दिल्ली पोलिसांना सांगतोय आणि महाराष्ट्र पोलीस अशा नोटीस पाठवतायत. आम्ही देशभरात तुमची वाहवाही करतोय. (Abhijeet Deepke) महाराष्ट्र पोलिसांनी स्वाभिमान जपावा. तुम्ही दिल्ली पोलिसांसारखे नाहीयत. जंतर-मंतर चंद्रपूर पोलिसांच्या अंडर कधी आलं?” असा सवाल अभिजीत दीपके यांनी विचारला.
हेही वाचा :
नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा
ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय