त्यांचं ठरलं आहे की राज ठाकरेंच्या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया?

“परिस्थिती वाईट आहे पण अशाही परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केला आहे की आमचं सरकार हे दुष्काळी परिस्थितीत समाजाला कुठेही त्या ठिकाणी कमी पडू देणार नाही”

निवडणूक आयोगातील मतभेदाचा विषय चव्हाट्यावर आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर अन्य दोन सहआयुक्तांनी आक्षेप घेतले आहेत.(situation) यामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलं आहे. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलले आहेत. “त्यांचं ठरलं आहे की या संवैधानिक संस्था आहेत, त्यावर काहीतरी आरोप करायचे, काहीतरी नरेटीव सेट करणे, असे आरोप म्हणजे शिळी भाकरी वाटते” असं चंद्रशेखर बावनकुळे बोलले. “इंडिया आघाडी जेव्हा पहिली तयार झाली, त्यात नवीन काय यांना केवळ निगेटिव्ह नरेटीव सेट करायचं असतं, राजस्थानच्या कोटामध्ये जाऊन गांधींनी नाटक केलं छात्र की गुंज घेतली, तिथे मात्र काँग्रेसचा पराभव झाला राहुल गांधी म्हणजे पराभव, मोदीजी म्हणजे विजय. जसा पराभव झाला तसा निवडणूक आयोग बोगस आहे, चुकीचा आहे असे आरोप करतात, पश्चिम बंगाल मध्ये पराभव झाला तर निवडणूक आयोग चुकीचा आहे” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय उपायोजना केल्यात त्याचीही माहिती दिली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली आमच्या अकरा सदस्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट सब कमिटी तयार केली आहे, दुष्काळाचा संपूर्ण आढावा घेणे, जिथे जशी परिस्थिती आहे तश्या पद्धतीने दुष्काळाच्या उपाययोजना करणे. (situation) यापूर्वी दुष्काळात शासनाने काय निर्णय घेतला त्या निर्णयप्रमाणे दुष्काळी विभागासाठी काय करता येईल, पंचनामे अचूक झाले पाहिजे” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.पिण्याचे पाणी वर्ष-दीड वर्ष कसं पुरेल याकडे लक्ष घातलं पाहिजे, जनावरांना चारा कसा मिळेल, रेशनचा अन्नधान्य कसं उपलब्ध करता येईल. या सर्व दुष्काळी उपाययोजना दुष्काळ बद्दलचे शासन निर्णय याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, दुष्काळी परिसरात त्या उपाययोजना पोहोचतात की नाही याकरिता कॅबिनेट सबकमिटी आहे” असं बावनकुळे म्हणाले.

“परिस्थिती वाईट आहे पण अशाही परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केला आहे की आमचं सरकार हे दुष्काळी परिस्थितीत समाजाला कुठेही त्या ठिकाणी कमी पडू देणार नाही, संपूर्ण उपाययोजना सरकार करेल. (situation) प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी सबकमिटी बसणार आहे आणि या बैठकीत आठवड्याचा आढावा आम्ही घेणार आहोत, सदस्य सचिव हे सेक्रेटरी आहेत या समितीच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा : 

गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? 

जोतिबा परिसर बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाला येणार गती?

कृष्णेत मिसळते दररोज ६.८० कोटी लिटर दूषित पाणी?