१ ली ते १२ वीच्या शिक्षकांसाठी ‘AI साथी’ कोर्स अनिवार्य जाणून घ्या सरकारचा नवा नियम?

राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना आता कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी ‘एआय साथी फॉर एज्युकेटर्स’ हा ऑनलाइन कोर्स निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून शिक्षणात एआयचा सुरक्षित, प्रभावी आणि नैतिक वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांनी ‘दीक्षा’ पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘एआय साथी फॉर एज्युकेटर्स’ या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. या कोर्ससाठी 31 ऑगस्ट 2026 ही नोंदणीची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. या संदर्भात SCERT ने राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना पत्र पाठवून प्रत्येक शिक्षकाने दिलेल्या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण करावे, (teachers) यासाठी आवश्यक देखरेख ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांची मूलभूत माहिती दिली जाणार आहे. तसेच अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी एआयचा वापर कसा करावा, अध्ययन साहित्य तयार करण्यासाठी आधुनिक एआय साधनांचा उपयोग, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व अभिप्राय प्रक्रिया अधिक प्रभावी बनवणे, शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाजात जबाबदारीने एआयचा वापर करणे, डेटा गोपनीयता, सायबर सुरक्षितता आणि नैतिकतेचे महत्त्व अशा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. भविष्यात शिक्षण व्यवस्थेत एआयचा वापर अधिक वाढणार असल्याने शिक्षकांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे SCERT ने स्पष्ट केले आहे.

हा ऑनलाइन कोर्स शिक्षकांना स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून सहज पूर्ण करता येणार असल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील शिक्षकांनाही प्रशिक्षण घेणे सोपे होणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत या कोर्ससाठी 4 तासांचे सीपीडी श्रेयही मंजूर करण्यात आले आहे. (teachers) त्यामुळे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठीही या प्रशिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सध्या जगभरातील शिक्षण व्यवस्थेत एआय आधारित साधनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार शिक्षण देणे, त्यांच्या प्रगतीचे विश्लेषण करणे, प्रश्नसंच तयार करणे आणि प्रशासकीय कामाचा ताण कमी करणे अशा (teachers) अनेक क्षेत्रांत एआय उपयुक्त ठरत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर करताना चुकीची माहिती, डेटा सुरक्षितता आणि नैतिकतेसारख्या मुद्द्यांवर विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याने प्रशिक्षणात ‘सुरक्षित आणि जबाबदार एआय वापर’ या विषयावर विशेष भर देण्यात आला आहे.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?