भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. इराणसोबतच्या युद्धामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेला मोठा दणका देण्यात आला.

अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ लावण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आपले टॅरिफचे शस्त्र बाहेर काढले. भारताला 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी देण्यात आली. (Donald Trump) त्यामध्येच आता भारतीय औषध निर्माण कंपन्यांना मोठा दणका देण्यात आला. अमेरिकेने ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टॅरिफ लागू करण्याची मोठी घोषणा केली. या घोषणेचा थेट दणका भारताला बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, या निर्णयाचा उद्देश औषधांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे हा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेचा थेट भारतावर भयंकर परिणाम झाला. भारतातून अनेक औषध अमेरिकेत निर्यात केली जातात. इतका मोठा टॅरिफ लावल्यानंतर त्याचा थेट परिणाम भारतावर होणार.

भारत हा अमेरिकेत जेनेरिक औषधे निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. त्यामुळेच या निर्णयाचा मोठा परिणाम आणि फटका भारतात बघायला मिळेल. ट्रुथ सोशलवर पोस्ट शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, हे शुल्क 1 ऑगस्टपासून टप्प्याटप्याने लागू केले जाईल. पहिल्या दोन वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या जेनेरिक औषधांवर कोणतेही शुल्क लागणार नाही.तिसऱ्या वर्षी हे शुल्क 100 टक्क्यांपर्यंत असेल. (Donald Trump) त्यानंतर त्याच वाढ करून 200 टक्क्यांपर्यंत ते पोहोचेल. 1 ऑगस्ट 2026 पासून अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवरील आयात टॅरिफ दोन वर्षांसाठी शून्य राहील. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, जेनेरिक औषधांचे उत्पादन पुन्हा अमेरिकेत आणण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.

ज्या कंपन्या दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्यात अपयशी ठरतील, (Donald Trump) त्यांना दंडाला सामोरे जावे लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. कंपन्यांना अमेरिकेत आपले प्रकल्प उभारल्याशिवाय काही पर्याय नसणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधे निर्माण कंपन्यांना मोठा दणका दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे भारतीय कंपन्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. मोठे संकट या कंपन्यांपुढे उभे आहे.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?