अमेरिका-इराण शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी काय आहेत 14 अटी?

पश्चिम आशियातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तणावाला अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिका आणि इराण यांनी 14 कलमी सामंजस्य कराराच्या मसुद्यावर सहमती दर्शवली असून, या करारामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष (Donald Trump) यांनी करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिली आहे, तर इराणनेही या कराराला दुजोरा दिला आहे. यांनी करार अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट केले आहे.

या सामंजस्य करारानुसार दोन्ही देश आणि त्यांचे सहयोगी तात्काळ युद्धबंदी लागू करतील तसेच एकमेकांविरोधात कोणतीही लष्करी कारवाई न करण्याचे आश्वासन देतील. पुढील 60 दिवसांत व्यापक आणि अंतिम शांतता करारावर चर्चा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कराराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची प्रक्रिया. या जलमार्गातून जागतिक तेलवाहतुकीचा मोठा हिस्सा जात असल्याने त्याचे पुनरुज्जीवन जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. (Donald Trump) याशिवाय अमेरिकेने इराणवरील आर्थिक निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवण्याची तयारी दर्शवली असून, इराणच्या तेल निर्यातीला पुन्हा परवानगी देण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे पुन्हा सुरू झाल्यास जागतिक ऊर्जा बाजारातील अनिश्चितता कमी होण्याची शक्यता आहे.

याशिवाय इराणच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी सुमारे 300 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक योजनेवर काम करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. गोठवलेली आर्थिक मालमत्ता परत करणे, बँकिंग आणि व्यापार क्षेत्रातील निर्बंध शिथिल करणे तसेच आर्थिक सहकार्य वाढवणे यांसारख्या मुद्द्यांचाही करारात समावेश आहे. अणुकार्यक्रमाबाबत इराणने पुन्हा एकदा अण्वस्त्रे विकसित न करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. संवर्धित युरेनियमचे व्यवस्थापन आणि देखरेखच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे मान्य करण्यात आले आहे. अंतिम करार होईपर्यंत इराण अणुकार्यक्रमाचा विस्तार करणार नाही, तर अमेरिका नवीन निर्बंध लादणार नाही किंवा अतिरिक्त सैन्य तैनात करणार नाही. विश्लेषकांच्या मते, हा करार यशस्वीपणे अंमलात आला तर पश्चिम आशियातील दीर्घकालीन संघर्ष कमी होण्यास मदत होईल. (Donald Trump) तसेच जागतिक तेल बाजार, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रादेशिक सुरक्षेवरही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. अंतिम शांतता कराराला ची मान्यता मिळाल्यास या प्रक्रियेला अधिक बळ मिळणार आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?

जल व्यवस्थापनाचे तीन तेरा पाच दशकांनंतर पाणीबाणी!

स्लोव्हाकियाशी भागीदारी वाढवणार : पंतप्रधान मोदी