सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाणे हद्दीतील मायथळ सोलनकर वस्ती येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. विहिरीच्या पाण्यात बुडून आई आणि तिच्या अवघ्या १८ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, सोलनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत महिलेचे नाव निता गजानन सोलनकर (वय २९) असून, (incident) त्यांच्या १८ महिन्यांच्या मुलीचे नाव अवनी गजानन सोलनकर आहे. दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला माहिती दिली.

माहिती मिळताच रेस्क्यू पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे ४० बाय ६० फूट आकाराच्या विहिरीत बचावकार्य सुरू करण्यात आले. (incident) पथकाने अथक प्रयत्न करत काही वेळातच आई आणि बाळाचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

रेस्क्यू कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. आई आणि चिमुकल्या बाळाच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी केलेला (incident) आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या घटनेने मायथळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बचावकार्यात आपत्ती व्यवस्थापन सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सचे सिनियर कमांडर कैलास वडर, कमांडर महेश गव्हाणे, सागर जाधव, आमिर नदाफ, इर्शाद कवठेकर, आसिफ मकानदार, लहू घोरपडे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास उमदी पोलीस करीत आहेत.

हेही वाचा : 

नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा

ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय

शेतकरी तहानले अधिकारी गायब