कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र असलेल्या अतिशय क्षेत्र बाहुबली येथे होणाऱ्या पंचकल्याणक महामहाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येने येणाऱ्या श्रावक-श्राविकांची साेय व्हावी यासाठी आवश्यक साेयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने २० कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर केला आहे. आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून (Rahul Awade) त्यातून परिसराच्या विकासाला यामुळे गती मिळणार आहे.

श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे दर १२ वर्षांनी पंचकल्याणक महामहाेत्सव साजरा केला जातो. याठिकाणी देशभरातून लाखाेंच्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित राहणार आहेत. होणारी गर्दी लक्षात घेऊन तीर्थक्षेत्राकडे येणाऱ्या हातकणंगले-नेज-कुंभाेज या मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे. (Rahul Awade) त्याचबराेबर तीर्थक्षेत्र स्थळी पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळ आणि इतर नागरी सुविधांची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या मागणीला राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली आहे.महामहोत्सवापूर्वी सर्व कामे उच्च दर्जाची आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला आहे. शासनाकडून २० काेटींचा भरीव निधी मंजूरकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमती सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे सहकार्य लाभले.
हातकणंगले तालुक्यातील बाहुबली (कुंभोज) हे जैन धर्मीयांचे कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्याच्या उत्तरेस सात कि. मी. अंतरावर हे स्थान वसले आहे. प्राचीन काळापासून बाहुबलीचा डोंगर जैन मुनींची तपस्याभूमी म्हणून ओळखला जात असल्याचे दिसते. (Rahul Awade) आजही या ठिकाणी आठशे वर्षापूर्वीची ६ फूट उंचीची १००८ भगवान बाहुबलींची अतिशय सुंदर, कलापूर्ण मूर्ती व प्राचीन सहस्र जिनबिंब आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहेत. ही बाहुबलीची मूर्ती इ.स. ११५६ मध्ये शके १०७८ च्या वैशाख शुद्ध दशमीस श्री १०८ श्रृतसागर मुनिराज यांच्या प्रेरणेने स्थापन झाल्याचा उल्लेख दिगंबर जैन तीर्थक्षेत्र डिरेक्टरीमध्ये मिळतो. सुमारे ३०० वर्षापूर्वी नांद्रे येथील बाहुबली मुनींनी येथे केलेली तपश्चर्या, १९२६ मध्ये तेथे झालेला चक्रवर्ती आचार्य शांतीसागर महाराज यांचा चातुर्मास, धर्मप्रेमी श्री कल्लाप्पा निखे यांनी घातलेला रत्नत्रय मंदिराचा पाया व त्यासाठी बांधलेली दुमजली चिरेबंदी भव्य इमारत या सर्व गोष्टीमुळे या भागात या पहाडाला जैन धर्मियांच्या दृष्टीने वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा :
राज्यातील साखर कामगार २२ ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर कोल्हापुरात इशारा मोर्चावेळी घोषणा
MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले
सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यूEdit