नरडाणा औद्योगिक वसाहतीतील पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करत तब्बल ८० हजार २०८ पेट बॉटल्सचा साठा जप्त केला. या साठ्याची अंदाजे किंमत ८ लाख १६ हजार ३२० रुपये आहे. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मिथ्या छापाचे तसेच कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार एफडीएच्या पथकाने नरडाणा एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक टी-११ येथील शिवाय बिव्हरेजेस एलएलपी या आस्थापनेची तपासणी केली. (bottles) यावेळी ‘बरेली’, ‘ग्रीष्मा एक्वा’ आणि ‘एक्वा अजंता’ या तीन प्रकारच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे नमुने घेण्यात आले.
नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, (bottles) संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित आस्थापनेविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एफडीएकडून मिठाई, खवा आणि अन्य खाद्यपदार्थांच्या तपासण्या सुरू आहेत. (bottles) दोन दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे कारवाई करत भेसळीचा संशय असलेला ३२५ किलो खवा जप्त करण्यात आला होता. या खव्याची किंमत ७४ हजार ७५० रुपये असून, दोन विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा :
राज्यातील साखर कामगार २२ ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर कोल्हापुरात इशारा मोर्चावेळी घोषणा
MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले
सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यूEdit