गोकुळ हवं आपल्याच घरी राजकारण मग डोन्ट वरी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

आयुष्यभर राजकारणच करावयाचे असेल, निवडणूक लढवायची असेल, तर मग अशा जिल्हा पातळीवरील राजकारण्यांसमोर प्रमुख असे तीन चार पर्याय असतात. पहिला पर्याय आमदार होण्याचा, दुष्काळ पर्याय जिल्हा बँकेवर संचालक म्हणून जाण्याचा, तिसरा पर्याय गोकुळ दूध संघावर निवडून जायचा आणि चौथा पर्याय गेला बाजार एखाद्या साखर कारखान्याचा संचालक होण्याचा! सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच रणांगण सुरू आहे. (politicians) त्यासाठी उपसलेल्या तलवारी कदाचित बिनविरोधच्या निर्णयाने म्यान केल्या जातील.

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतांचे संकलन करण्यासाठी करोडो रुपयांची घुसळण केली जाते. पण त्याआधी उमेदवारी मिळणे महत्त्वाचे असते. गोकुळचे संचालक पद आपल्याच घरी असले पाहिजे यासाठी नेत्यांचा अट्टहास असतो. मग दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा विचार होतो. हा कार्यकर्ता सुद्धा आपल्या अवतीभवती सतत असला पाहिजे हा विचार नेते मंडळी करत असतात.आनंदराव पाटील चुयेकर, अरुण नरके, महादेवराव महाडिक, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, डोंगळे बंधू, विश्वासराव पाटील, सरुडकर पाटील, पी एन पाटील, (politicians) यांच्याच भोवती गोकुळ दूध संघाचं राजकारण आत्तापर्यंत आणि आज सुद्धा फिरत राहिलेलं आहे. गोकुळ दूध संघ किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक हातामध्ये असेल तर लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक लढवू नये सोपे जाते.

एक काळ असा होता की, गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर केव्हा झाली आणि तिचा निकाल केव्हा लागला? कारण तेव्हा काँग्रेस ची एकतर्फी सत्ता गोकुळ दूध संघावर होती. “आतील “कारभार सहसा बाहेर चर्चेला येत नव्हता. संघाची वार्षिक उलाढालही नजरेत भरावी इतकी नव्हती. नंतर हळूहळू गोकुळ मधील लोण्यावर कुजबुज सुरू झाली. कोणत्या संचालकांचे किती टँकर संघात भाडेतत्त्वावर आहेत याबद्दल चर्चा सुरू झाली आणि नंतर गेल्या 30 ते 40 वर्षात गोकुळ च्या संचालकांची श्रीमंती दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यावर येऊ लागली. अर्थात गोकुळच्या संचालक पदा भोवती अनेकांच्या महत्त्वकांक्षा फिरू लागल्या. मग एक वेळ विधानसभेचे तिकीट नको पण गोकुळचे संचालक पद द्या असा आग्रह दुय्यम फळीतील नेत्यांकडून धरला जाऊ लागला. त्याच्याहीपूर्वी साखर कारखान्याच्या संचालक पदाला अनन्य साधारण महत्त्व होते. तेव्हा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर राजकारण्यांचे फड जमू लागले. हळूहळू हे कारखाने राजकारणाचे अध्यक्ष बनले. आता त्याची जागा गोकुळ दूध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतली आहे.

संचालकाच्या घरी मंगल कार्य आहे, मग त्याचा खर्च गोकुळ मधून केला जातो. संचालकांच्या दिमतीला चार चाकी वाहने दिली जातात. सहलीसाठी पैसा उपलब्ध करून दिला जातो. संचालकांच्या घरच्या मंडळींसाठी तीर्थयात्रांचा खर्च गोकुळ कडून केला जातो, (politicians) अशा चर्चा ऐकायला येऊ लागतात. आणि मग गोकुळ च्या संचालक पदाचे महत्त्व किती आहे हे लक्षात येते.गोकुळ ही सहकारी तत्त्वावरील व्यापारी संस्था आहे. तिची उलाढाल वार्षिक चार ते साडेचार हजार कोटी रुपयांची आहे. ढोबळ नफा, निव्वळ नफा मोठ्या प्रमाणावर संघाला होतो. एवढी प्रचंड उलाढाल असलेली संस्था आपल्या हातात असेल तर मग कोणतीही निवडणूक लढवणे सोपे होऊन जाते. आणि म्हणूनच कोणत्याही स्थितीत या संस्थेवर आपलीच हुकूमत असली पाहिजे यासाठी सत्ता संघर्ष सुरू असतो आणि आताही सुरू आहे. काँग्रेसच्या मंडळींनी स्थापन केलेली, ही सहकारी तत्त्वावरील व्यापारी संस्था आपल्या ताब्यात अप्रत्यक्षपणे का होईना आली पाहिजे असे जोरदार प्रयत्न यंदा पाहायला मिळाले. यानिमित्ताने गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला वाटाघाटीच्या केंद्रस्थानी आला होता.

हेही वाचा : 

LPG सिलेंडर परत देताना मिळणार 500 रूपये, ग्राहकांसाठी कामाची माहिती

बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह १४ बड्या आमदारांना मतदानाला बंदी

लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये, दिवाळी गोड होणार