” राजकिय ” रामायण “

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी

अयोध्या मंदिर आर्थिक घोटाळा अर्थात दानपेटी चोरी प्रकरणी 14 पेक्षा अधिक सेवकांना अटक केली असली तरी विश्वस्तांना चौकशीच्या रडारवर आणले गेले पाहिजे. विश्वस्त मंडळ बरखास्त करून किंवा विश्वस्त मंडळाचे प्रमुख चंपत राय घेऊन राम भक्तांचा प्रक्षोभ कमी करता येईलही, पण भाजपला या प्रकरणातून अलिप्त राहता येणार नाही. ” अब हिंदू मार नही खायेगा ” हे वाक्य अटल बिहारी बाजपेयी यांनी टॅग लाईन बनवले होते. (Ayodhya temple) पण आता ” अब हिंदू माफ नही करेगा ” ही टॅग लाईन उद्धव ठाकरे यांची शिवसेना रविवारी रस्त्यावर उतरली होती. राम रक्षा आंदोलन राज्याच्या काही भागातही झाले आहे.

श्रीराम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी महाविकास आघाडी मधील घटक पक्षाच्या नेत्यांनीही भाजपवर हल्लाबोल केला असला तरी राम रक्षा आंदोलनात आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी नव्हती. (Ayodhya temple) त्यांना आपलं पुरोगामीत्व धोक्यात येईल अशी भीती वाटली असावी. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर दादर येथील मारुती मंदिर परिसरात रामरक्षा आंदोलन केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक भाग असलेल्या विश्व हिंदू परिषद, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्तीचा लढा सुरू केला होता आणि हा लढा यशस्वी होतो आहे हे दृष्टीपथात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने हा लढा हाय जॅक केला मंदिर वही बनायेंगे ही टॅग लाईन महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या लढ्याला बळ दिले. एका अर्थाने राम मंदिर निर्माणा मागे शिवसेनेचाही मोठा सहभाग आहे हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही. जय श्रीराम हे भाजपचं सध्याचं घोषवाक्य आहे, ठाकरे गटाचं जय भवानी जय शिवाजी हे घोषवाक्य आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला त्यांची बोटे त्यांच्याच डोळ्यात घालण्यासाठी श्रीराम मंदिर आर्थिक घोटाळ्याचा प्रभावी मुद्दा हाती घेतला आहे.

राम मंदिर दानपेटीतील शेकडो कोटी रुपयांचा भाजपने केला आहे इतर पक्ष फोडण्यासाठी असा सणसणाटी आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अशा प्रकारचा गंभीर आरोप करण्याची संधी भाजपकृत विश्वस्त मंडळांने शिवसेनेला दिली आहे. ज्या राम जन्मभूमी मुक्तीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला मोठे राजकीय यश मिळाले आहे, (Ayodhya temple) त्याच राम मंदिर दानपेटीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुरू आहे. राम मंदिर निर्माण विश्वस्त मंडळाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एक कोटी रुपयांचे दान दिले होते. याचा नैतिक मुद्दा ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे.एकूणच भारतीय जनता पक्षाने त्यांच्या राजकारणासाठी श्रीराम मंदिर हा विषय अजेंड्यावर घेतला होता. आता हाच विषय दानपेटी चोरी प्रकरणाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अजेंड्यावर आणलेला दिसतो. एकूणच सध्या राजकीय ” रामायण” महाराष्ट्रात सुरू आहे. असे म्हणता येईल.

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हा भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू ठरेल हे या देशातील करोडो राम भक्तांच्या ध्यानी मनीही नव्हते पण श्नीरामालाअध्यात्मातून उचलून राजकारणाच्या सारीपाटावर बसवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने कौशल्याने केले आणि हा पट जिंकून भाजपाने केंद्रात आणि महाराष्ट्रासह काही राज्यांत सत्ता हस्तगत केली.आता याच श्रीरामाने भाजपसमोर मोठी अडचण निर्माण केली आहे.श्नीराम मंदिर कोषागारातील चोरी प्रकरणी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने रविवारी दादर येथील हनुमान मंदिर परिसरात” राम रक्षा” आंदोलन करण्यात आले.यावेळी “भाजप मुक्त राम “करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.हे आंदोलन भर पावसात झाले.या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकिय “रामायण” सुरु झाले आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?