राहुल गांधी यांच्या एका व्हायरल व्हिडिओवरून त्यांच्यावर टीका करत आमदार राहुल आवाडे यांनी सोशल मीडियावर आक्रमक पोस्ट केली; मात्र, ही पोस्ट त्यांच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. आवाडे यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्समधून त्यांना चांगलेच सुनावले असून, काहींनी (Rahul Awade) त्यांच्या राजकीय भूमिकेची आठवण करून देत थेट सवाल उपस्थित केले आहेत. ‘राहुल साहेब, तुमचे नाव राहुल गांधी यांच्या नावावरून ठेवले असल्याची आठवण ठेवा,’ अशी टिप्पणी करत एका नेटकऱ्याने आवाडेंना टोला लगावला आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना राहुल आवाडे यांनी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याशी गलिच्छ वर्तन केल्याचा आरोप केला. तसेच, ‘राहुल गांधी यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली. ‘एकीकडे स्मॅश द पॅट्रिआर्कीची ढोंगी भाषणे ठोकायची आणि दुसरीकडे महिला पोलिसांशी इतक्या खालच्या पातळीची वागणूक द्यायची?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.मात्र, आवाडेंच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स असून, नेटकऱ्यांनी त्यांनाच लक्ष्य केले आहे. ‘मागील कित्येक वर्षे तुम्ही काँग्रेससोबत होता,’ (Rahul Awade) अशी आठवण एका नेटकऱ्याने करून दिली आहे. तर काहींनी राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
‘तुमचं नाव राहुल गांधींच्या नावावरूनच ठेवलंय’ राहुल आवाडे यांच्या नावावरूनही काही नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. ‘राहुल साहेब, तुमचं नाव राहुल गांधी यांच्या नावाने ठेवले आहे, हे विसरू नका,’ अशा आशयाच्या कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आवाडेंना लक्ष्य केले. त्यामुळे राहुल गांधींवरील टीकेसाठी केलेली पोस्टच आवाडेंच्या ट्रोलिंगचे कारण ठरल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. (Rahul Awade) दरम्यान, राहुल गांधी यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर राहुल आवाडे यांनी केलेल्या पोस्टनंतर त्यांच्या भूमिकेवरही सोशल मीडियातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा :
LPG सिलेंडर परत देताना मिळणार 500 रूपये, ग्राहकांसाठी कामाची माहिती
बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह १४ बड्या आमदारांना मतदानाला बंदी