शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावरील हनुमान मंदिराजवळ दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात शेडशाळचे सरपंच सुनील संकपाळ, दत्त कारखान्याचे व्हा. चेअरमन शरदचंद्र पाठक यांच्यासह एकजण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.5 मे) संध्याकाळी घडली.(accident) मिळालेल्या माहितीनुसार, शेडशाळचे सरपंच सुनील संकपाळ आणि बाळू माणकापुरे हे आपल्या ‘MH 10 DQ 3760’ या कारमधून शिरोळहून नृसिंहवाडीच्या दिशेने जात होते. याच वेळी नृसिंहवाडीकडून शिरोळकडे जाणाऱ्या ‘MH 12 SE 6325’ या कारने त्यांच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातामध्ये सरपंच सुनील संगपाळ आणि बाळू माणकापुरे हे जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या कारमधील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक हे किरकोळ जखमी झाले आहेत. (accident) दोन्ही वाहनातील एअरबॅग वेळीच उघडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावरील वाहतूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यात ७२ हजार जणांचे मोफत रेशन बंद
भारत-व्हेनेझुएला ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन भागीदार
पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज काय आहे अपडेट?