कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
मराठी रंगभूमी, मराठी आणि हिंदी चित्रपट, वेब सिरीज, आणि सामाजिक विश्वात अगदी तन्मयतेने जमणारे, वावरणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी आकस्मिक घेतलेली एक्झिट कला विश्वावर शोक प्रहार करणारी आहे. मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट चा विद्यार्थी ते असामान्य कलाकार, ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मसीहा, ते सामाजिक कामात स्वतःचा खिसा अगदी निर्वीकरपणे रिप्लाय करणारा”आपला माणूस”अशी ओळख असणारे नाना पाटेकर हे विजयाबाई मेहता यांच्या अलिखित अभिनय विद्यापीठाचे स्नातक होते. विजयाबाईंना ते गुरुस्थानी मानायचे. (Nana Patekar) त्यांच्या हक्कस्मिक निधनाने रुपेरी पडदा गाजवणारा एक नटसम्राट काळाच्या पडद्यामागे गेला आहे.

राघू मैना, माफीचा साक्षीदार, डॉक्टर प्रकाश आमटे, सूत्रधार, नटसम्राट, असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी त्यांच्या वास्तववादी अभिनयाने गाजवले. परिंदा, अंगार, अंकुश, अग्निसाक्षी, अब तक 56, यशवंत, शागीर्द, राजनीति, अपहरण, प्रहार, क्रांतिवीर, तिरंगा, वेलकम अशा त्यांच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. रसिकांच्या मनावर गारुड करणाऱ्या नाना पाटेकर यांनी बहुतांशी हिंदी चित्रपटात खलप्रवृत्ती भूमिका साकारल्या. यशवंत, प्रहार सारख्या चित्रपटात त्यांनी मध्यवर्ती भूमिका केल्या होत्या. (Nana Patekar) काही महिन्यापूर्वीच संकल्प नामक एक हिंदी वेब सिरीज रिलीज झाली होती. त्यामध्ये त्यांची मध्यवर्ती भूमिका होती. पण सामाजिक क्षेत्रात विशेषतः शेतकऱ्यांसाठी काम करताना ते नायकासारखे वावरले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्यांनी “नाम” नामक सामाजिक संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी आणण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून ते प्रयत्न करत राहिले.
एकदा त्यांना परदेशी बनावटीची एक कोटी 15 लाख रुपये किमतीची कार खरेदी करावयाची होती. पण तेव्हा मराठवाड्यात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. म्हणून मग त्यांनी कार खरेदी करण्यासाठी चे पैसे त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दान करून टाकले.नाना पाटेकर हे दानशूर होते पण त्याची ते प्रसिद्धी करत नसत. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये असे ते म्हणत असत. कोल्हापूर महापालिकेच्या शूटिंग रेंजला त्यांनी अशीच एकदा काही लाख रुपयांची मदत केली होती तर केशवराव भोसले नाट्यगृह नजीक असलेल्या देवल क्लब वास्तूसाठी त्यांनी भरीव आर्थिक योगदान दिले होते.
आयुष्य हे मुठीत ठेवलेल्या वाळू सारखे असते. ही मूठ केव्हा ना केव्हा रीती होणार आहे. तेव्हा आपण जे काही कमावले आहे त्यापैकी काही भाग समाजासाठी ओंजळ भरून द्यावा. असे ते समाजाला आवाहन करत असत.उत्तम व्यवहारे जोडोनिया धन, उदास विचारे ते वेच करी इतक्या निर्विकार पणे नाना पाटेकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना, उपेक्षित कलाकारांना, सामाजिक संस्थांना आर्थिक सहाय्य केले. स्पष्ट वक्ता, फटकळ, कोणाशीही पंगा घेणारा अशी नाना पाटेकर यांची ख्याती होती. प्रभू कुंज या निवासस्थानासमोरून जाणाऱ्या उड्डाण पुलाला विरोध केला म्हणून लता मंगेशकर यांना परखड शब्दात फटकारणारा एक लेख त्यांनी एका नामवंत वृत्तपत्रात लिहिला होता. तर पु. ल. देशपांडे यांना मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र भूषण हा शासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पु. ल. देशपांडे यांनी राजकीय संयुष्नता यावर प्रतिकूल भाष्य करताना राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी “सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यायचा आणि सरकारवरच टीका करायची”अशी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तेव्हा नाना पाटेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून”तुमची प्रतिमा आमच्या हृदयात आहे. तिला तडे जाऊ देऊ नका”असे भावनिक आवाहन केले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी”त्याचा खामोशी एकदम खामोश झाला”असा पलटवार केला होता. नाना पाटेकर अभिनेता खामोशी हा हिंदी चित्रपट तिकीट खिडकीवर तेव्हा साफ कोसळला होता.
प्रहार हा अतिशय महत्त्वकांक्षी चित्रपट निर्माण करण्यापूर्वी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका करण्यासाठी नाना पाटेकर यांनी बेळगाव येथील लष्करी कॅम्पस मध्ये तीन वर्षे कठोर प्रशिक्षण घेतले होते. अटल बिहारी बाजपेयी हे पंतप्रधान असताना पाकिस्तान बरोबर कारगिल युद्ध झाले होते. जॉर्ज फर्नांडिस हे तेव्हा संरक्षण मंत्री होते. नाना पाटेकर यांनी त्यांची थेट भेट घेऊन मला सीमेवर लढायचे आहे मला परवानगी द्या अशी मागणी केली होती. (Nana Patekar) त्यासाठी त्यांनी आपण तीन वर्षे लष्करी प्रशिक्षण घेतले असल्याचे सांगितले होते. तेव्हा त्यांना कारगिल युद्धामध्ये एक लढवय्या सैनिक म्हणून भाग घेण्यास अनुमती देण्यात आली होती.जगण्याचे त्यांचे वेगळे असे एक तत्त्वज्ञान होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्यांनी साधी राहणी स्वीकारली होती. विचार आणि सदरा असा त्यांचा ड्रेस कोड बनला होता. अनेकदा त्यांच्या कपड्यांना इस्त्री ही केलेली नसायची. विजयाबाई मेहता यांच्या काही नाटकात काम करताना त्यांची अशोक सराफ यांच्याशी दाट मैत्री झाली होती.
आर्थिक अडचणीच्या काळात अशोक सराफ यांनी त्यांना मदत केली होती. परतफेड करताना ते अशोक सराफ यांना म्हणाले होते की मी पैसेच परत करतोय, तेव्हाची वेळ मी परत करू शकत नाही. रंगभूमी, हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी, वेब सिरीज या सर्व कला प्रांतावर अभिनयाची मोहर उमटवणाऱ्या नाना पाटेकर यांना तुफान लोकप्रियता मिळाली होती पण त्यांनी त्यासाठी कधीही “स्टार डम”तयार केला नाही. विलक्षण वलय असूनही वलयाच्या पलीकडे ते जीवन जगले.कोल्हापूरशी त्यांचा विलक्षण जिव्हाळा होता.
वेळ मिळेल तेव्हा, संधी मिळेल तेव्हा ते कोल्हापूरला यायचे. कोल्हापुरात त्यांचे काही चाहते होते.
हेही वाचा :
तेरवाड येथे भरधाव डंपरची तीन दुचाकींना धडक तिघांचा मृत्यू , चौघे गंभीर