‘हे पाहून मला मुस्लीम असल्याची लाज वाटते…’; पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड गायक संतापला

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांची हत्या झाली. यात 28 भारतीयांनी त्यांचा जीव गमावला. या सगळ्या घटनेनंतर लोकांनी या प्रकरणात संताप(Anger) व्यक्त केला आहे.

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप(Anger) व्यक्त केला आहे. अशातच बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सलीम मर्चंटनं एक पोस्ट शेअर करत यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर सलीमनं एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला असून मला मुस्लीम असल्याची लाज वाटत असल्याचं देखील म्हटलं आहे.

सलीम मर्चंटनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सलीमनं संताप(Anger) व्यक्त केला आहे. सलीम या व्हिडीओत बोलताना दिसत आहे की “पहलगाममध्ये मारले गेलेले निष्पाप लोक मुस्लीम नसून हिंदू असल्यानं मारले गेले? महत्त्वाचं म्हणजे हे मारेकरी मुस्लीम आहेत का? तर नाही, ते दहशतवादी आहेत. कारण इस्लाममध्ये हे सर्व शिकवलं जात नाही.

इस्लाम म्हणतो की, धर्माच्या बाबतीत कोणतीही सक्ती नाही. माझ्या हिंदू बंधू-भगिनींना इतक्या क्रूरपणे मारण्यात आवलं. तो दिवस मला पहावा लागला, हे पाहून मला मुस्लिम असल्याची लाज वाटते. फक्त ते हिंदू आहेते म्हणून, हे सर्व कधी संपेल? गेल्या तीन वर्षांपासून शांततेत जगणारे काश्मीरमधील रहिवासी पुन्हा त्याच वादळाचा सामना करत आहेत.”

सलीम मर्चंट पुढे म्हणाला, “माझं दु:ख आणि राग कसा व्यक्त करायचा हे मला समजत नाही. ज्या निष्पाप लोकांनी त्यांचा जीव गमावला, त्यांच्या कुटुंबीयांना देव शक्ती आणि समृद्धी देवो, याची मी प्रार्थना करतो. ओम शांती.”

सलीम मर्चंटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सलीमनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला पाठिंबा दिला आहे. तर अनेकांनी तो योग्य बोलतोय असं म्हटलं आहे. तर कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं देखील सलीम मर्चंटचा हा व्हिडीओ शेअर करत हे सत्य असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा :

मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट, राजस्थान रॉयल्सला BCCI चा सपोर्ट

अखेर प्रतीक्षा संपली दहावी बारावीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर

पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील बैठकीत मोठा निर्णय?; भारतीय सैन्य दलाला सतर्कतेचा इशारा