मोदींच्या लोकसेवेची पंचविशी वास्तव आणि विश्लेषण

आपल्या तंदुरुस्त प्रकृतीचे रहस्य काय? या प्रश्नावर”मी रोज शिव्या खातो”असे मिश्किल उत्तर देणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर काम करण्याची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या दोन तपांमध्ये त्यांच्या कारकिर्दीचे, कारकिर्दीतील कामाचे मूल्यमापन, विश्लेषण किंवा चिकित्सा अनेक विचारवंतांनी तसेच राजकीय विश्लेषकांनी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान असे त्यांच्या कारकिर्दीचे दोन वेगवेगळे कालखंड आहेत. त्यामुळे दोन वेगवेगळ्या चष्म्यातून त्यांच्या कामाकडे पाहिले पाहिजे.

नरेंद्र मोदी हे गुजरातचे जवळपास 13 वर्षे मुख्यमंत्री होते. (Narendra Modi) त्यांच्याच काळात गोध्रा हत्याकांड झाले. अल्पसंख्यांक समाजावर त्यांनी अत्याचार केले अशी एक प्रतिकूल प्रतिमा त्यांची तयार केली गेली होती. विशेष म्हणजे त्यामुळे अमेरिकेने तेव्हा त्यांना व्हिसा नाकारला होता. गंमत म्हणजे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर याचा अमेरिकेने त्यांच्यासाठी अमेरिकेत रेड कार्पेट अंथरले होते. डोनाल्ड ट्रम्प तसेच रशियाचे ब्लादेमीर पुतीन हे मोदी यांना जवळचे मित्र मानतात.2001 मध्ये मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी गुजरातचा मोठा विकास केला. आणि या विकासाची देशभर “गुजरात मॉडेल” नावाने जोरदार चर्चा सुरू केली. गुजरात मॉडेल हे असत्य आहे असे तेव्हा सांगणाऱ्या शरद पवार यांचा आवाज त्या चर्चेत कोणालाच ऐकू आला नाही. एकूणच गुजरात मॉडेलच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे नाव सर्वतोमुखी झाले.

गोध्रा हत्याकांडानंतर मोदी यांनी हाताळलेल्या परिस्थितीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्यांचा प्रभाव वाढलेला होता. 2013 ते 14 च्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन गोवा येथे झाले. या अधिवेशनात लालकृष्ण अडवाणी यांचा अप्रत्यक्ष विरोध डावलून नरेंद्र मोदी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. (Narendra Modi) त्यानंतर 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपने जिंकली आणि नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टर्म मध्ये मोदी यांच्यावर विरोधकांच्या कडून टीका सुरू झाली. अच्छे दिन कुठे गेले? असा खोचक सवाल त्यांना विचारला जाऊ लागला. याच दरम्यान पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली. मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोलचे दर प्रति लिटर 74 रुपये होते आणि ते त्यांनी स्थिर ठेवले होते. याची आठवण करून देण्यात येऊ लागली. वाढत्या महागाई बद्दल त्यांना जहाल भाषेत टोकले जाऊ लागले. चौकीदार चोर आहे, असे त्यांना राहुल गांधी यांच्याकडून म्हणले जाऊ लागले. पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये ईव्हीएम घोटाळा, मत चोरी, असा ठपका ठेवला जातो आहे.

काश्मीरचे विभाजन, काश्मीर साठी असलेले 370 कलम हटवणे, सर्जिकल स्ट्राइक, आणि ऑपरेशन सिंदूर यामुळे ते हिंदूंचे लोकप्रिय पंतप्रधान ठरले. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना त्यांनी कारगिल युद्ध जिंकले होते आणि (Narendra Modi) त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाक विरुद्धचे युद्ध जिंकले आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या नावाचा दबदबा वाढला. राष्ट्रीय सुरक्षा परिषद तसेच ब्रिक्स च्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाची ओळख जगभर झाली. जगातील 36 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळवणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत.2029 पर्यंत ते पंतप्रधान पदावर राहणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांच्याच चेहऱ्याचा वापर केला जाईल मात्र ती निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी हे चौथ्यांदा पंतप्रधान होतील किंवा नाही हे आत्ताच ठामपणे सांगता येणार नाही.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा दौरा सुरू, 8 ते 11 ऑक्टोबर दुष्काळाचा आढावा

‘गोकुळ’साठी तालुक्याच्या ठिकाणी मतदान मतमोजणी कोल्हापुरात!

सर्वात मोठी बातमी शिवसेना कुणाची सुनावणी कधी संपणार फैसला कधी