आणखी दोन दिवसांनी ( ११ ऑक्टोबरपासून) कोल्हापुरात शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन भवानी मंडप येथे येत्या रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.(Kolhapur) दुष्काळ व आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर यंदा दसरा महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून शुक्रवारी सांगण्यात आले.

या नवरात्र महोत्सवात जिल्हा प्रशासनातर्फे कोल्हापूरवासियांसाठी अनेक उपक्रम साजरे होणार आहेत. या उपक्रमाला जिल्हावासीयांनी प्रतिसाद द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज आयोजित करण्यात आलेल्या दसरा महोत्सव आढावा बैठक प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. स्त्री शक्तीचा सन्मान होणाऱ्या या महोत्सवामध्ये येत्या सोमवारी जिल्ह्यातील सर्व शाळां, महाविद्यालयांमध्ये पारंपारिक वेशभूषा हा उपक्रम घेण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी -विद्यार्थिनीं ,पालक , शिक्षक आदींनी सहभाग नोंदवावा. महिलांचीही दुचाकी मिरवणूक आयोजित करण्यात येणार आहे. (Kolhapur) या दोन्ही उपक्रमांचे रिल्स तरुणाई, सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी विविध समाज माध्यमांवर प्रसारित करावेत अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या आढावा बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जि.प उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, तहसीलदार स्वप्निल पवार, तेजस्विनी पाटील,माध्य. शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथ.शिक्षणाधिकारी श्री घुगे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख,जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, देवस्थान समिती सचिव श्रीमती वर्षा साळुंखे,क्रांतीकुमार मिरजकर,अग्निशमन दलाचे मनीष रणभिसे यांच्यासह इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक २ (छत्रपती शिवाजी मार्केट) आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने भवानी मंडप परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात आज कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान एक हातगाडी, पाच स्टँड बोर्ड, पाच स्टील काऊंटर, एक लोखंडी पार्किंग जाळी, एक लोखंडी टेबल, एक टेंथ, दोन फायबर स्टूल, सात फायबर खुर्ची, ओटीचे २२ नग व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असून, पुढील काळातही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. (Kolhapur) अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी जप्त करण्यात आलेले साहित्य संबंधित व्यवसाय धारकांना परत दिले जाणार नसून ते कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे. या मोहिमेत सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, विभागीय कार्यालय क्रमांक २ व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.
हेही वाचा :
‘गोकुळ’साठी तालुक्याच्या ठिकाणी मतदान मतमोजणी कोल्हापुरात!
सर्वात मोठी बातमी शिवसेना कुणाची सुनावणी कधी संपणार फैसला कधी