राज्यातील एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड संदर्भातील सक्तीची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे. (Smart card) ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाने 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर केली असून, पात्र प्रवाशांना या कालावधीत कार्ड मिळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्मार्ट कार्डच्या सक्तीला मिळाली मुदतवाढ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (Smart card) त्यानुसार 1 ऑगस्टपासून हे कार्ड सक्तीचे होणार होते. मात्र, अनेक प्रवाशांनी अर्ज आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अद्याप प्रत्यक्ष स्मार्ट कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने पात्र नागरिक सवलतींपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचा निर्णय घेत कार्ड सक्तीची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर पात्र प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध झाला असून, त्यांची होणारी गैरसोय टळणार आहे.
राज्य सरकारकडून अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत दिला जातो. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के भाडे सवलतीचाही लाभ मिळतो. या सर्व सवलती अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने देण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कार्ड वितरण पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटीच्या सवलती या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आहेत. केवळ तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही पात्र प्रवाशाला सवलतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, ही शासनाची भूमिका आहे. (Smart card) दरम्यान, एसटी महामंडळाने सर्व पात्र नागरिकांना वाढीव मुदतीचा लाभ घेत लवकरात लवकर एनसीएमसी स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून 1 सप्टेंबरनंतर सवलतींचा लाभ घेण्यात कोणतीही अडचण येऊ नये.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?