दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक कधी जाहीर होणार

दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक कधी जाहीर होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत आहेत. सीबीएसई लवकरच अधिकृत वेबसाइटवर दोन्ही परीक्षांचं शेड्युल जारी करण्याची शक्यता आहे. (exams) त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा संपण्याची शक्यता आहे.

सीबीएसईच्या नियमानुसार, परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यासाठी आधी शाळांना विद्यार्थ्यांची यादी मागितली जाते. शाळांना देखील विलंब शुल्काशिवाय यादी सादर करण्याची मुदत ही 21 ऑक्टोबर 2026 दिली आहे. तर 30 ऑक्टोबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केले की, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात अंतिम वेळापत्रक वेबसाइटवर अपलोड केले जाईल.

सीबीईच्या मागील नोंदीनुसार, 2027 च्या बोर्डाची परीक्षा ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होतील. दरवर्षीप्रमाणने यंदाही बोर्डाच्या परीक्षा ही फेब्रुवारीच्या मध्यापासून मुख्य विषयांच्या परीक्षा सुरू होतील. विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा या जानेवारी 2027 मध्ये होण्याची शक्यता आहे. बोर्ड हे विद्यार्थी वेबसाईटवर वेळापत्रक सेव्ह करू शकतात. सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर तुम्हाला वेळापत्र पाहायला मिळेल. या वेबसाइटवर तुम्हाला लेटस्ट अनाऊन्समेंट किंवा परीक्षेच्या कॉलमवर क्लिक करावे लागेल. (exams) त्यानंतर तुम्हाला दहावी आणि बारावीच्या वेगवेगळ्या लिंक्स दिसतील. या लिंक्स उघडल्यानंतर संपूर्ण वेळापत्रक पीडीएफ स्वरुपात मिळेल.

परीक्षाच्या तारखा जवळ येत आहे. त्यात सीबीएसईने विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाचे आणि कठोर नियम स्पष्ट केले आहेत. बोर्डाच्या परीक्षांना बसण्यासाठी शाळेत किमान 75 टक्के हजेरी अनिवार्य असणार आहे. (exams) ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असेल, त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. तर विद्यार्थ्यांना अंतिम वेळापत्रक जाणून घेण्यासाठी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही बनावट वेळापत्रकाला बळी पडू नये. तुम्हाला वेळापत्रकाविषयी अधिकृत माहिती हवी असल्यास, तुम्ही सीबीईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

हेही वाचा : 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी आडवा,पाणी जिरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

नापास झालेल्या कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार

कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी तत्काळ करा