सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लवरकरच होणार वाढ, किती

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. नव्या वेतन आयोगामुळे मूळ पगारात किती वाढ होणार, महागाई भत्ता (DA) मूळ वेतनात विलीन केला जाणार का आणि फिटमेंट फॅक्टर किती निश्चित होणार, (employees) याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. 2.15 फिटमेंट फॅक्टरचा अंदाज विचारात घेतल्यास पगारात किती बदल होऊ शकतो, याची चर्चा सुरू आहे. मात्र, यासंदर्भातील अंतिम निर्णय अद्याप अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

8व्या वेतन आयोगाकडून सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि विविध भत्त्यांचा आढावा घेतला जात आहे. आयोगाच्या पथकाकडून विविध शहरांमध्ये कर्मचारी संघटना, पेन्शनधारक आणि संबंधित घटकांच्या मागण्या जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सूचनांचा विचार करून वेतनरचनेबाबत शिफारशी तयार केल्या जाण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, महागाई भत्ता म्हणजेच DA मूळ वेतनात विलीन करण्याचा मुद्दाही चर्चेत आहे. सध्या कर्मचाऱ्यांना महागाईनुसार DA दिला जातो. जर DA विलिनीकरणाचा निर्णय घेतला गेला, तर मूळ वेतनाची गणना आणि नव्या वेतनरचनेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. नव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चित करताना महागाई भत्त्याची पुढील गणना कशी केली जाईल, हे सरकारच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल.

फिटमेंट फॅक्टर हा नव्या वेतन आयोगातील पगारवाढ ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे. 2.15 फिटमेंट फॅक्टर गृहीत धरल्यास सध्याच्या मूळ वेतनाच्या तुलनेत नवीन वेतन किती होऊ शकते, याचा अंदाज बांधता येतो. उदाहरणार्थ, लेव्हल 6 मधील कर्मचाऱ्यांचे सध्याचे मूळ वेतन 35,400 रुपये आहे. (employees) त्यावर 2.15 ने गुणाकार केल्यास 76,110 रुपये होतात. मात्र, हा केवळ गणिती अंदाज आहे. प्रत्यक्ष वेतन निश्चित करताना DA विलिनीकरण, वेतन मॅट्रिक्स, लागू नियम आणि आयोगाच्या शिफारशींचा विचार होऊ शकतो. त्यामुळे ही रक्कम अंतिम मूळ वेतन समजू नये.

लेव्हल 7 आणि लेव्हल 8 मधील कर्मचाऱ्यांच्या पगारातही नव्या वेतनरचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्येक वेतन स्तरावरील कर्मचाऱ्यांना किती वाढ मिळेल, हे फिटमेंट फॅक्टर आणि अंतिम वेतन मॅट्रिक्स निश्चित झाल्यानंतरच स्पष्ट होईल. तसेच मूळ वेतनातील वाढ आणि हातात मिळणारा प्रत्यक्ष पगार यामध्ये फरक असू शकतो, कारण त्यावर भत्ते, कपाती आणि इतर लागू नियमांचा परिणाम होतो.

8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनंतरही पगारवाढ लागू होण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे पूर्ण होणे आवश्यक आहे. आयोगाचा अहवाल सादर होणे, सरकारकडून शिफारशींचा विचार करून मंजुरी देणे आणि (employees) त्यानंतर अधिकृत अधिसूचना जारी होणे, ही प्रक्रिया महत्त्वाची ठरेल. त्यामुळे 2.15 फिटमेंट फॅक्टर किंवा DA विलिनीकरणाबाबत अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी समोर येणाऱ्या आकडेवारीकडे संभाव्य अंदाज म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा दौरा सुरू, 8 ते 11 ऑक्टोबर दुष्काळाचा आढावा

‘गोकुळ’साठी तालुक्याच्या ठिकाणी मतदान मतमोजणी कोल्हापुरात!

सर्वात मोठी बातमी शिवसेना कुणाची सुनावणी कधी संपणार फैसला कधी